Mumbai Local Train Viral Video: मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. दिवसाला लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. लोकल आणि रेल्वेस्थानकावरील अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने मुंबईकरांची झोप उडवली आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील परळ रेल्वे स्थानकावर एका नराधमाने लज्जास्पद कृत्य केलं आहे. रेल्वेस्थानकावर महिलांच्या डब्यासमोर उभा राहून नराधमाने चक्क हस्तमैथुन केले. गुरूवारी हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान, या विकृताने केलेल्या अश्लिल कृत्याचा एका महिलेने व्हिडीओ शूट केला आणि ट्विटरवरून मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. (Breaking Marathi News)
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान महिलेच्या ट्विटला रेल्वे सुरक्षा दलाने प्रतिक्रिया देत ट्विट केले की, सदरील विकृत तरुणाचा तपास केला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे फलाटावरील लोकांकडे आम्ही याबाबत चौकशी केली. परंतू कुठल्याच प्रकारची माहिती मिळालेली नाही.
नेमकं काय घडलं?
महिलेने ट्विटरवरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गुरूवारी सदरील महिला ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघाली. नेहमीप्रमाणे ती परळ रेल्वेस्थानकावर आली. यावेळी एक विकृत व्यक्ती तिथे आला आणि त्याने या महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, विकृताचे कृत्य पाहून महिला अजिबात घाबरली नाही. तिने अगदी धाडसाने त्याचे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिस (Police) स्थानकावर येण्याआधीच हा विकृत व्यक्ती लोकल पकडून फरार झाला.
दरम्यान, विकृताने केलेल्या या अश्लिल कृत्याचा व्हिडीओ महिलेने ट्विटरवर शेअर करत पोलिसांना टँग केले. व्हिडीओ समोर येताच, महिलेच्या ट्विटला रेल्वे सुरक्षा दलाने प्रतिक्रिया दिली. सदरील विकृत तरुणाचा तपास केला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत असं कृत्य करण्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी जोर धरत आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.