भाजप नेत्याचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात, डोक्यात गोळी लागली अन् बाजूला पिस्तूल; नेमकं काय घडलं?

BJP Leaders Brother: भाजप नेत्याच्या भावावर गोळीबार. डोक्यात गोळी लागली. पोलिसांनी तरूणाला रूग्णालयात नेलं. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांकडून तपास सुरू.
BJP Leaders Brother
BJP Leaders BrotherSaam
Published On
Summary
  • भाजप नेत्याच्या भावावर गोळीबाराचा प्रकार.

  • डोक्यात गोळ्या लागल्यानं गंभीर जखमी.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या भावावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना रिगा पोलीस स्टेशन परिसरातील रामनगरा एनएच - २२ जवळ घडली. पोलिसांना तरूण गंभीर अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. जवळच रक्तानं माखलेला लोडेड पिस्तूलही पोलिसांना आढळला. पोलिसांनी तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर पोलीस ठाण्यात उपचार सुरू आहेत

विक्रम कुमार (वय वर्ष २५) असे जखमी तरूणाचे नाव आहे. खासगी रूग्णालयाक उपचार घेतल्यानंतर त्यांना मुझफ्फरपूरला नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम कमलदाह गावातील रहिवासी विजय ओझा यांचा मुलगा आहे. तसेच विक्रम हे भाजप युवा मोर्चाच्या राज्य कार्यालय प्रभारींचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP Leaders Brother
DJ च्या दणदणाटामुळे चिमुकली रडत राहिली, २ महिन्यांच्या मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, गावात हळहळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल ११२ ची गाडी परिसरात गस्त घालत होती. दरम्यान, २० ते २५ मीटर अंतरावर पोलिसांना एक बाईक दिसली. बाईकच्या शेजारी तरूण झोपलेला दिसला. पोलीस बाईकजवळ गेले, तेव्हा तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे निदर्शनास आले. तरूणाच्या डोक्यात गोळी लागली होती.

BJP Leaders Brother
भर दुपारी घरात घुसला, १७ वर्षीय तरूणीवर सपासप चाकूनं वार; CCTV मुळे आरोपीचं पितळ उघड

पोलिसांनी त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्ष मनीष कुमार, आमदार मिथिलेश कुमार, माजी मंत्री डॉ.रामचंद्र पूर्व आणि भाजप नेते विशाल कुमार यांनी रूग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.

BJP Leaders Brother
BJP नेत्याला शिवीगाळ अन् कानशिलात लगावली; कार्यकर्त्यांचा ठिय्या, पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

तरूणाला गोळी लागली कशी, हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. कुटुंबाचा देखील जबाब नोंदवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com