BJP नेत्याला शिवीगाळ अन् कानशिलात लगावली; कार्यकर्त्यांचा ठिय्या, पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

Police Inspector Suspended: भाजप कार्यकर्त्याला बँकेत मारहाण. पोलीस निरीक्षक सुनील कुमार राय यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप.
Police Inspector Suspended
Police Inspector SuspendedSaam
Published On
Summary
  • भाजप कार्यकर्त्याला मारहाण.

  • पोलिसांवर गैरवर्तानाचा आरोप.

  • भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात ठिय्या.

उत्तरप्रदेशच्या मिर्जापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. भाजप नेत्याला मारहाण केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. त्यांनी कटरा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपच्या नेत्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी आंदोलनातून माघार घेतली नाही. यानंतर पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले.

मिर्झापूर जिल्ह्यातील नरघाट गावातील रहिवासी कृष्ण कुमार सिंह हे भाजप नगर मंडळ पश्चिमीचे महामंत्री या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, कामानिमित्त ते बँकेत गेले होते. यावेळी पोलीस इन्स्पेक्टर सुनील कुमार राय बँकेत आले होते. तिथे त्यांच्यासोबत बोलणं झालं.

Police Inspector Suspended
शिवाजीनगर भुयारी मार्गावर दुचाकी घसरून अपघात; ६४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंतर त्यांना ओळखण्यात चूक झाल्यानंतर भाजप नेते बँक काऊंटरवर गेले. यानंतर संतप्त पोलीस इन्स्पेक्टर सुनील कुमार राय यांनी कृष्ण कुमार सिंग यांच्याशी असभ्य वर्तन केले. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. नंतर कानशिलातही लगावली, असा आरोप कृष्ण कुमार यांनी पोलीस इन्स्पेक्टर सुनील राय यांच्यावर केला.

Police Inspector Suspended
खवय्यांना धक्का! मासळीच्या किमतीत वाढ, कारण ठरलंय बर्फ, किती रूपयांनी होणार वाढ?

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस निरीक्षक त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्याकडील वस्तू जप्त केले. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच ठिय्या मांडला.

Police Inspector Suspended
पुण्यात ठाकरे गटाला धक्का? बडा नेता अजित पवारांसोबत जाणार? नेत्याची पत्नी दादांना भेटणार

माजी नगराध्यक्ष मनोज जयस्वाल यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षकाने बँकेत कामावर गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केले. त्यामुळे पोलिसाच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी एसएसपी सोमेन बर्मा यांनी निरीक्षकाला निलंबित करण्यात येईल, असे सांगितले. दोन तासांनंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com