बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये आईवर मुलाकडून लैंगिक अत्याचार
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली
एफआयआर नोंदवून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले
प्रकरणाचा सखोल तपास सुरू
आई आणि मुलाचं नातं निखळ असतं, मात्र याच निखळ नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोटच्या मुलाने आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावात पोटे (बदलेलं आडनाव) यांचं कुटुंब राहतं. पीडित महिला स्वरूपा पोटे (बदलेल नाव) हिचा पती स्वरूप पोटे (बदलेलं नाव) घटनेच्या दिवशी कामावर गेला होता. तर स्वरूपा घरात अंघोळ करत होती. घरी कोणीही नसल्याची संधी साधून तिचा मुलगा वृषाल (बदलेलं नाव) याने प्रसाद देण्याच्या बहाण्याने तिला बाहेर बोलावले. महिला त्याच्याजवळ गेल्यानंतर आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला, तिचे तोंड दाबले आणि जबरदस्तीने एका खोलीत नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच घटनेनंतर कोणालाही याबाबत माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
पती घरी परतल्यानंतर पत्नी रडत असल्याचे पाहून त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी गावातील प्रमुखांना माहिती देत सकरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी हा ऑटोचालक असून त्याला दारूचे व्यसन आहे. नशेच्या अवस्थेत तो अनेकदा घरात गोंधळ घालत असल्याचेही सांगितले जात आहे. आरोपी वृषालचे लग्न झाले असून त्याला ३ मुलं देखील आहेत.घटनेच्या दिवशी आरोपीची पत्नी माहेरी गेली असल्याचं तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत डीएसपी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या जबाबावरून एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी पूर्ण करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.