आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

Jeevika Didi Yojana: बिहार सरकार सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात १० हजार रूपये पाठवणार आहे. या योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी आणि आर्थिक बळकटी देण्याचं बिहार सरकारचं उद्दिष्ट आहे.
Jeevika Didi Yojana
Bihar government to credit ₹10,000 into bank accounts of eligible women under Mahila Rojgar Yojana.saam tv
Published On
Summary
  • सरकार १४ डिसेंबरपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा करणार आहे.

  • महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत

  • एकूण १० लाख जीविका दीदींच्या खात्यात पैसे पाठवले जाणार

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत, बिहार सरकार १४ डिसेंबरपर्यंत १० लाख जीविका दीदींच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये पाठवणार आहे. आतापर्यंत राज्यातील १.४ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी या योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जातेय. या योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक बळ देणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

Jeevika Didi Yojana
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

रोजगाराच्या संधी

सरकार सर्व पात्र महिलांना १४ डिसेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पाठवणार आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल. यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी आणखी निर्माण होतील. महिलांच्या कल्याण आणि सक्षमीकरण करण्याच्या दिशेने हे बिहार सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

Jeevika Didi Yojana
Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचे करिअर करण्यास आर्थिक मदत देणे आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या आवडीचा रोजगार मिळविण्यासाठी मदत म्हणून १० हजारांची रक्कम दिली जाते. महिलांनी रोजगार सुरू केल्यानंतर, मूल्यांकनानंतर आवश्यकतेनुसार २ लाखांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com