Nitish Kumar : राहुल गांधी राहणार २०२४ मध्ये विरोधी पक्षाचा PMपदाचा चेहरा? नितीश कुमारांच्या विधानानंतर चर्चेला उधाण

लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षांची एकी आणि पंतप्रधानपदाचा चेहरा यावरील चर्चांना उधाण आलं आहे.
Nitish kumar and Rahul Gandhi
Nitish kumar and Rahul Gandhi Saam Tv
Published On: 

Nitish Kumar News : लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षांची एकी आणि पंतप्रधानपदाचा चेहरा यावरील चर्चांना उधाण आलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक मोठं भाष्य केलं आहे. 'राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारी आमचा विरोध नाही, अशी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Nitish kumar and Rahul Gandhi
Rahul Gandhi: 'BJP-RSS माझे गुरू; त्यांच्यामुळेच मला...' राहुल गांधींच्या वक्तव्याची रंगली चर्चा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'राहुल गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून आम्हाला कोणतीही अडचण नाही. यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक निर्णय घेण्याची गरज आहे. यावर आमचा काही आक्षेप नाही. बैठक घेऊन यावर चर्चा घेतली पाहिजे'.

' पक्षाच्या कामाशी आमचा संबंध नाही. पक्षातील नेते त्यांचा कामातून मोकळे होतील, त्यानंतर बैठक बोलवणार आहेत', असेही नितीश कुमार म्हणाले.

नितीश कुमार पुढे म्हणाले, 'आम्ही सर्व एकत्र चर्चा करू आणि त्यानंतर पुढे निर्णय घेऊ. त्याच आधारावर पुढील रणनीती ठरवू. आता सध्या सर्वांचा आपापला कार्यक्रम सुरू आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ इच्छित असाल, तर त्यावर आमचा आक्षेप नाही'.

काय म्हणाले होते कमलनाथ?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ म्हणाले होते की, 'विरोधी पक्षाचे संयुत्तपणे राहुल गांधी हे २०२४ चे पंतप्रधानपदाचे दावेदार असतील'. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची स्तुती करताना पुढे म्हणाले, 'राहुल गांधी हे सत्तेसाठी राजकारण करत नाही. तर सामान्य लोकांसाठी राजकारण करत आहे. तर लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे विरोधी पक्षांचा प्रमुख चेहरा म्हणून नेतृत्व करतील. तसेच पंतप्रधानपदाचे दावेदार राहतील'.

कमलनाथ पुढे म्हणाले, 'जगाच्या इतिहासात कोणीही इतकी मोठी यात्रा केली नाही. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त देशातील अन्य कोणत्याही कुटुंबातील लोकांनी त्याग केला नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी राजकारण करत नाही. तर देशाची जनता ही लोकांच्या हितासाठी राजकारण करणाऱ्यांना सत्तेवर बसवते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com