ठरलं! अखेर हार्दिक पटेल भाजपचं कमळ हाती घेणार; 2 जूनला होणार पक्षप्रवेश

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता हार्दिक पटेल भाजपचं कमळ हाती घेणार आहे.
Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates, Hardik Patel news in Marathi
Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates, Hardik Patel news in MarathiSaam TV

अहमदाबाद : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस (Congress) पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हार्दिक पटेल यांचा 2 जून रोजी भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे. (Hardik Patel Will Join To Bjp In Gujrat Election 2022)

Hardik Patel on Congress, Gujrat Assembly Election news updates, Gujrat news updates, Hardik Patel news in Marathi
'पुढील २५ वर्ष उद्धव ठाकरे…'; सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

'कॉंग्रेसचा हात' सोडल्यानंतर हार्दिक पटेल कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सोमवारी याबाबत त्यांनी विधानही केलं होतं. “मी सोमवारी भाजपात प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला कळवू.” असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. हार्दिक पटेल येत्या 2 जूनला भाजपमध्ये प्रवेश करणार असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. (Hardik Patel news in Marathi)

दरम्यान, पक्षातून राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने हार्दिक यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार पटेल मागील 6 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी हार्दिकच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात असल्याचा देखील आरोप केला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर आता हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. राजीनामा देत असताना त्यांनी कॉग्रेसच्या कार्यश्रेणीवर बोटही उठवलं होतं. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. येत्या 2 जून रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दीक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश करणं हा भाजपचा मोठा विजय मानला जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com