Stormy Daniels Case : न्यूयॉर्क कोर्टाचा स्टॉर्मी डेनियलला दणका; ट्रम्प यांना द्यावी लागणार मोठी रक्कम

Stormy Daniels News : कोर्टाने स्टॉर्मी डेनियलला कोर्टाने तब्बल 1,22,000 डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
Donald Trump-Stormy Daniels Case
Donald Trump-Stormy Daniels CaseSaam TV
Published On: 

Donald Trump-Stormy Daniels Case : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्टॉर्मी डेनियल नामक पॉर्न स्टारने गंभीर आरोप केले. या आरोपानंतर ट्रम्प यांना अटक देखील करण्यात आली. पण अटकेनंतर काही वेळातच त्यांची जामीनावर सुटका झाली. एकीकडे स्टॉर्मी डेनियल ट्रंम्प यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत असताना, दुसरीकडे कोर्टाने मात्र तिला मोठा झटका दिला आहे. (Breaking Marathi News)

Donald Trump-Stormy Daniels Case
Who is Stormy Daniels: स्टॉर्मी डॅनियल कोण आहे? जिला हॉटेलात बोलवून फसले डोनाल्ड ट्रम्प, वाचा सविस्तर...

कोर्टाने स्टॉर्मी डेनियलला कोर्टाने तब्बल 1,22,000 डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर बुधवारी न्यूयॉर्कच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने स्टॉर्मीला हा दंड ठोठावला असून ही रक्कम ट्रम्प यांना देण्यास सांगितलं आहे.

स्टॉर्मी डेनियलचे डोनाल्ड यांच्यावर गंभीर आरोप

स्टॉर्मी डॅनियलने आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘द अँप्रेटिस’ या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ही गोष्ट लपवण्यासाठी ट्रम्प यांनी तिला पैसेही दिले. (Latest Marathi News)

स्टॉर्मीचा आरोप आहे की, ती २००६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटली होती. यादरम्यान अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तिला हॉटेलमधील खोलीत जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेव्हा ती रुममध्ये गेली तेव्हा ट्रम्प यांनी तिच्यासोबत जवळीक साधली. आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.

Donald Trump-Stormy Daniels Case
Temple Vandalised In Canada : कॅनडात हिंदू मंदिरात तोडफोड, समाजकंटकांनी भारताविरोधात ओकले विष

ट्रम्प यांच्याविरोधात ३४ पानांचं आरोपपत्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ३४ पानांचं आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी नियमांचं उल्लंघन केलं. २०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नकारात्मक बातम्या छापून येऊ नये, खासकरून पॉर्न स्टारशी असलेल्या संबंधाच्या बातम्या छापल्या जाऊ नये म्हणून ट्रम्प यांनी ही रक्कम मोजल्याचा आरोप सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनाही भरावा लागणार मोठा दंड

डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अटकेनंतर ट्रम्प यांना कोर्टात  (Court) हजर केले असता, कोर्टाने त्यांची जामीनावर सुटका केली. या प्रकरणात ट्रम्प यांना जामीन मिळाला खरा पण कोर्टाने त्यांना १ लाख २२ हजार डॉलरचा दंड भरण्याचे आदेश दिले. ही दंडाची रक्कम पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com