आज एसटी आणि एसच्या आरक्षणातील वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात भारत बंदचा नारा देण्यात आलाय. बिहारमधील पाटणा या जिल्ह्यात भारत बंदचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आलेत. पंरतु याचदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांकडून एक मोठी घोडचूक झालीय. बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट एसडीएमला म्हणजेच उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर लाठीमार केलाय.
वरिष्ठ अधिकाऱ्यालाच आपल्याकडून लाठीमार्च केल्याचं समजल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंत पोलीस कर्मचाऱ्यांनी एसडीएमची माफी मागितली. साहेब हे चुकून झाल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. लाठीचार्ज करण्यात आलेल्या एसडीएमचे नाव एसडीएम श्रीकांत कुंडली खंड असे आहे. बंद दरम्यान समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना कठोरपणा दाखवावा लागला. त्यामुळे बाजारपेठ बंद करण्यासाठी बाहेर पडलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.
भारत बंददरम्यान डीजे आणि गाड्या घेऊन डाक बंगला चौकात पोहोचलेल्या आंदोलकांच्या जमावाला रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचा वापर केला. त्यावेळी एसडीएम गाडीवरील जनरेटर बंद करत होते. त्याचवेळी पोलीस कर्मचारी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत होते. या नादात त्यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर लाठीमार केला. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एसडीएम पांढरा शर्ट घातलेले दिसत आहेत. गाडीवरील लोड जनरेटर बंद करण्याच्या सूचना देत होते, यादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आंदोलक समजून त्यांच्यावर लाठीमार केला.
यानंतर एसडीएमला ओळखणाऱ्या तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लगेचच कर्मचाऱ्यांना थांबवले. तोपर्यंत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाठ्या बरसावल्या होत्या. यानंतर पोलीस अधिकारी आणि शिपयांनी याबद्दल खंत व्यक्त करत हे चुकून घडल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये कर्मचारी माफी मागताना आणि खेद व्यक्त करताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.