Bangladesh Accident : बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

Bangladesh Accident News: हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Bangladesh Accident News
Bangladesh Accident NewsSaam tv
Published On

Bangladesh News: बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. बांगलादेशातील मदारीपूरमध्ये ही घटना घडली. या अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर 30 प्रवाशी जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघातग्रस्त बस इमाद ट्रान्सपोर्टची होती. पोलिसांनी सांगितले की, ढाकाकडे जाणारी बस सकाळी साडेसातच्या सुमारास मदारीपूरमधील एक्स्प्रेस वेवर नियंत्रणाबाहेर गेली आणि दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bangladesh Accident News
Maharashtra Politics: रासपची वेगळी चूल! 'त्यांना आमच्या शुभेच्छा' म्हणत जानकरांनी दिला स्वबळाचा नारा

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मदारीपूरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मसूद आलम यांनी दिली आहे. तसेच 'निष्काळजीपणे बस चालवल्याने आणि यांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचेही ते म्हणाले. या अपघाताची सध्या त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Bangladesh Accident News
IPL 2023: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात BCCI चं कठोर पाऊल! फ्रेंचायझींची डोकेदुखी वाढणार?

फरीदपूर येथील अग्निशमन दलाचे उप सहाय्यक संचालक शिपलू अहमद यांनी सांगितले “ प्रथमिकदृष्ट्या असे लक्षात येते की, बस वेगाने चालवल्यामुळे चाक फुटले आणि बसचे नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. तसेच अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com