S Somnath: '...तर विध्वंस नक्की', पृथ्वीला धडकणार एस्टेरॉयड; इस्रो प्रमुखांनी दिला इशारा

S Somnath: जगभरातील अंतराळ संस्था पृथ्वीला एस्टेरॉयडपासून वाचवण्यासाठी ग्रह सुरक्षा क्षमतेची यंत्रणा तर करत आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत इशारा दिलाय.
 S Somnath: '...तर विध्वंस नक्की, पृथ्वीला धडकणार एस्टेरॉयड;  इस्रो प्रमुखांनी दिला इशारा
S SomnathGoogle

पृथ्वीवर एक अस्मानी संकट घोंघावत आहे. पृथ्वीजवळ एस्टेरॉयड असून त्याचा पृथ्वीला मोठा धोका आहे. एस्टेरॉयड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा एस्टेरॉयड जर पृथ्वीला धडकला तर पृथ्वीचा विध्वंस होईल, असा इशारा इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलाय.

30 जून 1908 रोजी सायबेरियातील तुंगुस्का या दुर्गम ठिकाणी लघुग्रहामुळे झालेल्या हवाई स्फोटामुळे सुमारे 2,200 चौरस किलोमीटर घनदाट जंगल नष्ट झालं होतं. यात साधरण 80 मिलियन वृक्ष नष्ट झाली होती. पृथ्वीजवळील एस्टेरॉयड असून ते पृथ्वीसाठी सर्वाधिक धोकेदायक असल्याचं म्हटलं जात आहे. 370 मीटर व्यासचे एपोफिस 13 एप्रिल 2029 साली पु्न्हा एका पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.

उल्कापातामुळे पृथ्वीवरील महाकाय प्राणी डायनासोर नष्ट झाल्याचं म्हटलं जातं. पृथ्वीचे लघुग्रहांपासून संरक्षण करण्यासाठी जगभरातील अंतराळ संस्था ग्रहांची संरक्षण क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहेत. इस्रोही याबाबत जबाबदारी घेण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

'आपले आयुर्मान 70-80 वर्षे आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात अशा आपत्ती दिसत नाहीत, म्हणून आम्ही असे मानतो की ते शक्य नाही. जर आपण जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला तर या घटना वारंवार घडत असतात. ग्रहांच्या जवळ येणारे लघुग्रह आणि त्यांचा प्रभाव पडत असतो. बृहस्पतिला आदळणारे लघुग्रह आपण पाहिले असल्याचं सोमनाथ म्हणालेत. शूमेकर-लेव्हीला आदळताना आपण पाहिलंय. पृथ्वीवर अशी कोणतीही घटना घडली तर आपण सर्व नामशेष होऊ, असा इशारा एस सोमनाथ यांनी दिलाय.

पुढे बोलताना ते म्हणाले ही शक्यता आहे. आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. पृथ्वी मातेच्या बाबतीत असे घडू नये, अशी आमची इच्छा आहे. येथे मानवता आणि सर्व सजीवांनी वास्तव्य करावं, अशी आमची इच्छा आहे. पण आपण ते थांबवू शकत नाही. आपल्याला पर्याय शोधावा लागेल. तर आपल्याकडे एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण ते दूर करू शकतो.

आम्ही पृथ्वीच्या जवळ येणारे लघुग्रह शोधू आणि त्याला दूर करू शकतो. कधीकधी हे अशक्य देखील असू शकते, असं सोमनाथ म्हणाले. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, अंदाज लावण्याची क्षमता, ते दूर करण्यासाठी तेथे मोठे प्रॉप्स पाठवण्याची क्षमता, निरीक्षण सुधारणं आणि प्रोटोकॉलसाठी इतर देशांसोबत एकत्र काम करणं आवश्यक, असल्याचं सोमनाथ म्हणाले.

 S Somnath: '...तर विध्वंस नक्की, पृथ्वीला धडकणार एस्टेरॉयड;  इस्रो प्रमुखांनी दिला इशारा
S. Somnath: इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान, आदित्य-एल1 मिशनच्या लॉन्चिंगदरम्यान मिळाली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com