देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचे (Assembly Election 2023) चित्र काही तासांमध्येच स्पष्ट होईल. या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक निकाल 2023 साठी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार ४ पैकी ३ राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या तिन्ही राज्यात भाजप आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या देशभरातील भाजप कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. अशामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी ३ राज्यातील भाजपच्या विजयानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या तिन्ही राज्यांच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) दिले आहे. त्यांनी मोदींचा लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'एक अकेला सब पर भारी!' असे कॅप्शन दिले आहे.
स्मृती इराणी यांनी नरेंद्र मोदीचा लोकसभेतील भाषणाचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी बोलत आहेत की,'देश बघत आहे की एकटा मी सर्वांवर भारी पडत आहे.' तीन राज्यांमध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना स्मृती इराणी यांनी मोदींचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तर स्मृती इराणी आणखी एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी 'देशात एकच गॅरंटी मिळते ती म्हणजे मोदी गॅरंटी आहे.' असे लिहिले आहे. सध्या स्मृती इराणी याचे हे दोन्ही ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरमयान, सध्या मध्यप्रदेशमधील २३० जागांपैकी १६४ जागांवर भाजप आघाडीवर तर ६४ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये भाजप ५५ जागांवर तर काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप ११५ जागांवर भाजप आणि ७० जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएस ४०, काँग्रेस ६४ आणि भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.