Assembly Election 2023 Result: ३ राज्यात भाजपचा दणदणीत विजय?, PM मोदी भाजप कार्यालयात करणार जल्लोष साजरा

PM Narendra Modi: आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, ४ पैकी ३ राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस एका राज्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam Tv
Published On

Delhi BJP Head Office:

देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे (Assembly Election 2023) सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका 2023 साठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, ४ पैकी ३ राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस एका राज्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्लीतील भाजप कार्यालयामध्ये विजयाची जय्यत तयारी सुरू आहे.

४ राज्यांपैकी ३ राज्यात भाज आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या राज्यातील भाजप नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत. याठिकाणी ते भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्याचसोबत ते भाजप कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा करणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील भाजप कार्यालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

३ राज्यात भाजपची आघाडी पाहून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी ढोल-ताशा वाजवून नाचत आहेत. मिठाई वाटून ते जल्लोष करत आहेत. या निकालामध्ये भाजपचा विजय होत असल्याचे पक्ष समर्थकांचे म्हणणे आहे. देशात मोदींची लाट पुन्हा सुरू झाली आहे. भाजपला पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार होते. मात्र आता याठिकाणी काँग्रेसची सत्ता भाजप काबिज करणार असल्याचे चित्र दिसत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल असे चित्र दिसत आहे. तर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

PM Narendra Modi
Chhattisgarh Bjp CM Face: छत्तीसगडमध्ये BJP जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची होत आहे चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com