आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

No New Aadhaar for 18+ Applicants In Assam: राज्यात होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयानुसार आता १८ वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळणार नाही.
Aadhar Card Update service
ASSAM GOVERNMENT RESTRICTS NEW AADHAAR CARDS FOR PEOPLE ABOVE 18 YEARSsaam tv
Published On
Summary
  • आसाम सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी नवीन आधार कार्डांवर निर्बंध घातले.

  • बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हा निर्णय घेतला.

  • आधार नोंदणी प्रक्रियेत अधिक कठोर पडताळणी करण्यावर सरकारचा भर आहे.

आता राज्यात १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही. राज्य सरकारने हा निर्णय घेतला. बांगला देशातून राज्यात येणाऱ्या नागरिकांचा लोंढा रोखण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं नाही तर आसाममधील सरकारनं घेतला आहे. आसाम राज्य सरकारनं आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतलाय. बेकायदेशीरपणे राज्यात येणाऱ्यांना नागरिकांच्या लोंढ्याला थांबवण्यासाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १८ वर्षावरील व्यक्तींना आधार कार्ड देण्यावर निर्बंध घातली आहेत.

Aadhar Card Update service
पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येतो? या समस्येपासून कशी कराल सुटका?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आधार कार्डचा निर्णय घेतला आहे. राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना सरकारी कागदपत्रे मिळवू नये, यासाठी १८ वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळणार नाहीये. विशेष परिस्थितीत जर आधार कार्ड आवश्यक असेल तर त्याच्या मंजुरीसाठी जिल्हा आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार आधार कार्ड मिळण्यास पात्र आहे की नाही, हे सरकार ठरवेल.

Aadhar Card Update service
Aadhaar Card Update: मोठी बातमी! आधार बनवण्यासाठी 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक, नवे नियम लागू, पण कोणते? वाचा...

राज्यातील आधार कार्ड वाटपाची प्रक्रिया पूर्णत्वाच्या टप्प्यावर (सॅचुरेशन पॉईंटवर) पोहोचल्याचे नमूद करत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "काही जिल्ह्यांमध्ये ही आकडेवारी १०० टक्क्यांच्याही पुढे गेली आहे. अतिरिक्त आधार कार्ड मिळवणारे हे लोक नेमके कोण आहेत, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचं ते म्हणालेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोणत्याही बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकाला आधार कार्ड मिळू नये, याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. चहाच्या मळ्यांमधील कामगार समुदाय, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड देण्याची प्रक्रिया सुरूच राहील, कारण अनेक व्यक्तींना अद्याप त्यांची आधार कार्ड्स मिळालेली नाहीत. हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की ही सवलत कायमस्वरूपी नसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com