

आधार कार्ड हे ओळखपत्र आपल्याला शाळेपासून ते नोकरीपर्यंतच्या सगळ्याच कामांमध्ये महत्वाचं असतं. मात्र UIDAI ने आधार बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. तुम्हाला जर आधार कार्ड नवीन पाहिजे असेल किंवा त्यात काही अपडेट करायची असेल तर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं असणं गरजेचं आहे. याआधी तुम्हाला या प्रक्रियेसाठी कमी कागदपत्रे लागत होती. पण आता यात वाढ करण्यात आली आहे. याचा उद्देश हा आधार कार्ड बनवताना चुका होऊ नयेत असा आहे.
तुम्हाला आता आधार अपडेट करण्यासाठी किंवा नवीन तयार करण्यासाठी विविध कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच नवीन नियमांनुसार Child Care Institution संस्थेत राहणाऱ्या मुलांसाठी District Child Protection Officer ने दिलेलं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. हा पुरावा आता महत्वाचा मानला जाणार आहे. पहिल्यांदाच, UIDAI ने तृतीयपंथी व्यक्तींशी संबंधित कागदपत्रांनाही मान्यता दिली आहे. OCI कार्ड होल्डर्सना आधार नोंदणीच्या वेळी एक वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणं आवश्यक असणार आहे.
तुम्हाला आधारमध्ये नाव अपडेट करायचं असेल तर पासपोर्ट हा महत्वाचा पुरावा ठरेल. कारण यामधला फोटो, पत्ता, जन्मतारिख आणि नाव नमुद केलेले असते. तसेच PAN कार्ट, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. तर तुमचं लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याने Aadhaar मधले नाव अपडेट करण्याची प्रोसेस सोपी होईल.
जन्माचा दाखला हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. पासपोर्ट, इयत्ता १०वी किंवा १२वीची गुणपत्रिका इत्यादींचाही वापर केला जाऊ शकतो.
तुमचा पत्ता बदलायचा असेल तर पासपोर्ट, बँक पासबुक किंवा नुकतेच केलेले बँक स्टेटमेंट हे पुरावे लागतात.वीज, पाणी आणि गॅसची बिलं सुद्धा ग्राह्य धरले जाईल. तुमचं मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि घर कर किंवा मालमत्ता कराच्या पावत्या सुद्धा ग्राह्य धरल्या जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.