CBSE 12th Result : बारावीचा निकाल जाहीर; ८५.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात पुणे कितव्या क्रमांकावर?

CBSE 12th Result 2026 Declared: CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा ८५.२० टक्के निकाल लागला आहे. तसेच मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. निकाल तपासण्यासाठी तुम्हाला अनेक डिजीटल अॅप आणि वेबसाइटचा वापर करता येऊ शकतो.
CBSE Class 12 Result 2026 Declared
CBSE Class 12 Result 2026 Declaredgoogle
Published On

बऱ्याच दिवसांपासून बारावीचा CBSE बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार Central Board of Secondary Education 2026 च्या बारावी परिक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. यंदाचा बोर्डाचा एकूण निकाल हा 85.20 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी यंदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.

CBSE बोर्डाचा निकाल कसा पाहावा? ( How to check CBSE Class 12 Result 2026)

CBSE बोर्डाचा निकाल जाहीर होताच देशभरातल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल हा https://www.cbse.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता. तसेच तुम्ही DigiLocker आणि UMANG अॅपवर लॉगिन करून सुद्धा रिझल्ट पाहू शकता. तिथे तुम्हाला डिजिटल मार्कशीटसोबत आवश्यक प्रमामपत्रंही ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येईल.

CBSE Class 12 Result 2026 Declared
SSC Result : दहावीच्या निकालाचा धक्का, कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थ्यांची आत्महत्या

CBSE बोर्डाचा यंदाचा निकाल किती?

CBSE बोर्डाच्या माहितीनुसार, यंदा लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या शाखांमधल्या विद्यार्थ्यांनी यंदा चांगली कामगिरी केली आहे. अनेकांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक प्रवेश, स्पर्धा परीक्षा आणि करिअर नियोजनाला वेग येईल.

बारावी CBSE बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती:

तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि अॅडनिट कार्ड आयडीची गरज आहे. वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढवण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना संयम ठेवणं गरजेचं आहे, असं आवाहन बोर्डाने केलं आहे.

तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबद्दल शंका असतील तर उत्तरपत्रिकेची प्रत मिळवण्यासाठी बोर्ड लवकरच प्रक्रिया सुरु करेल. तसेच CBSC बोर्डाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्जल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

CBSC निकालात पुणे कितव्या क्रमांकावर?

बारावीच्या CBSC निकालात पुणे विभागाचा निकाल हा ८७. ३२ टक्के इतका लागला आहे. तर तिरुवनंतपुरम विभागाने ९५.६२ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. चेन्नई ९३.८४ टक्के आणि बेंगळूरूमध्ये विद्यार्थ्यांनी ९३.१९ टक्के मिळवले. या यादीत पुणे दहाव्या क्रमांकावर आहे.

CBSE Class 12 Result 2026 Declared
Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com