Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

Arvind Kejriwal E20 Petrol ban promise goa assembly elections : E20 पेट्रोलला देशात काही ठिकाणी विरोध होत असताना, राजकीय पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांनी आमचं सरकार आलं तर इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर बंदी घालणार असल्याची घोषणा केली आहे.
...तर ५ दिवसांत इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर बंदी घालू, अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा
Arvind Kejriwal On E20 petrol Ban in Goasaam tv
Published On

गोव्यात आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर, पुढच्या पाच दिवसांत इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. गोव्यात मंगळवारी E20 पेट्रोलविरोधात घेण्यात आलेल्या टाउनहॉलमध्ये ते बोलत होते.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला. जनता आम्हालाच मतदान करेल, सरकार आमचंच येईल, असं यांना वाटतं. जनता आमच्याकडेच येईल, जाऊन जाऊन जाणार कुठे, असा अहंकार यांना झाला आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीत गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर, मी तुम्हाला सांगतो की १० मार्च २०२७ रोजी निकाल जाहीर होतील आणि १५ मार्चपर्यंत E20 बंद होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. गोव्यात ८७ टक्के वाहनचालक इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळं त्रस्त आहेत, तर ८७ टक्के नागरिकांकडे दुचाकी आहे, तर ४७ टक्के नागरिकांकडे चारचाकी वाहन आहे, असेही ते म्हणाले.

सगळ्यांनी मिळून एकदा ठरवलं की यावेळी भाजपला मतदान करायचे नाही. तर मला वाटतं की ५ दिवसांच्या आत इथेनॉलमिश्रित पेट्रोलवर बंदी घातली नाही तर मी राजकारण सोडेन, असा ठाम विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. यावेळी गोव्यात तुम्ही भाजपला पराभूत करून दाखवा, पाच दिवसांच्या आत E20 पेट्रोल बंद करण्यात येईल. गोव्यात २०२७ मध्ये आमचं सरकार स्थापन झालं तर पुढील पाच दिवसांत राज्यात इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल, असेही ते म्हणाले.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहने नादुरुस्त होतात, याशिवाय मायलेजही कमी होत आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला होता. E20 पेट्रोलच्या वापरासंबंधी आपण जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्या आधारे हा दावा केल्याचंही केजरीवाल म्हणाले होते. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. सरकारच्या या धोरणामुळं साखरेचे दरही वाढले. २५ लाख टन साखर निर्मिती होईल इतका ऊस इथेनॉल निर्मितीसाठी पाठवण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने विरोधकांचा हा दावा आधीच खोडून काढला आहे. साखरेचे दर वाढल्यानंतर सरकारने स्पष्टीकरणही दिलं होतं. साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते.

...तर ५ दिवसांत इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर बंदी घालू, अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा
E20 आता राहुल गांधींच्या टार्गेटवर, 'E20 मुळे स्कूटर, कार खराब होतात'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com