माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका; ७ खासदारांच्या भाजप प्रवेशाला मंजुरी, सत्ताधाऱ्यांची ताकद आणखी वाढणार

AAP crisis : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. ७ खासदारांच्या भाजप प्रवेशाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यसभेत सत्ताधाऱ्यांची ताकद वाढणार आहे.
AAP crisis news
AAP crisisSaam tv
Published On
Summary

अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का

७ बंडखोर खासदारांना भाजप प्रवेशास मंजुरी

राघव चढ्ढा, हरभजनसिंह यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी आम आदमी पक्षाच्या ७ बंडखोर खासदारांना भाजप प्रवेशासाठी मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूर्वी 'आप'ची साथ सोडल्याचे जाहीर केले होते. 'आप'मधून बाहेर पडल्यानंतर बंडखोरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या खासदारांशी संबंधित राज्यसभा सचिवालयाने अधिसूचना जारी केली आहे.

आम आदमी पक्षाचे ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सत्ताधाऱ्यांची राज्यसभेत ताकद वाढली आहे. राज्यसभेत भाजप खासदारांची संख्या ११३ वर पोहोचली आहे. तर मागील आठवड्यात ७ खासदारांनी केजरीवाल यांची साथ सोडली. त्यामुळे 'आप'कडे तीनच खासदार राहिले आहेत. 'आप'मधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ७ खासदारांपैकी ६ खासदार हे पंजाबमधून राज्यसभेवर पोहोचले आहेत.

AAP crisis news
२८ आमदार सोडणार पक्ष; सरकार कोसळण्याची शक्यता, बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

मागच्या आठवड्यात सोडला होता पक्ष

आम आदमी पक्षाला मागील आठवड्यातील शुक्रवारमध्ये मोठा धक्का बसला. राघव चढ्ढा, हरभजन सिंह, अशोक मित्तल, संदीप पाठक, विक्रम साहनी, राजेंद्र गुप्ता आणि स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांची साथ सोडली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्ष सिद्धांत विसरला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार बलबीर सीचवेल यांनी दावा केला आहे की, बंडखोर खासदारांनी मला देखील भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. परंतु त्यांना नकार दिला'.

AAP crisis news
ठाकरे-पवारांचा पक्ष फोडला, तोच वॉशिंग मशिनचा खेळ पंजाबमध्ये; मुख्यमंत्री मान भाजपवर संतापले

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी रविवारी सभापती राधाकृष्ण यांना पत्र पाठवून ७ खासदारांना अपात्र करण्याची मागणी केली. आम आदमी पक्षाची साथ सोडणाऱ्या ७ खासदारांना अपात्र करण्यासाठी खासदार संजय सिंह यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न फोल ठरले. राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी सातही खासदारांना भाजप प्रवेशासाठी मंजुरी दिली. संजय सिंह यांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन प्रकरणाचा संदर्भ दिला होता. उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बंडखोरांना अपात्र केलं आहे, असे संजय सिंह यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com