Odisha Train Accident: ओडिशात पुन्हा एक रेल्वे अपघात, मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले; पाहा व्हिडिओ

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
Odisha Train Accident
Odisha Train AccidentSaam Tv
Published On: 

Train Accident News Today: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला. तर ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातच आता ओडिशात आता आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

Odisha Train Accident
Buldhana News : जीवाच्या भीतीने प्रवाशांनी बसच्या खिडकीतून मारल्या उड्या; जाणून घ्या देऊळघाट येथे नेमकं काय घडलं

बारगढ जिल्ह्यातील मेंधापलीजवळ मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. दरम्यान ही भारतीय रेल्वेची मालगाडी नसून एका खासगी सिमेंट कंपनीची त्यांच्या कारखान्याच्या आवारातील मालगाडी असल्याचे समोर आले आहे. (Train Accident)

इस्ट कोस्ट रेल्वेने या घटनेची माहिती देताना सांगितले की, ओडिशातील (Odisha) बरगढ जिल्ह्यातील मेंधापालीजवळ एका खाजगी सिमेंट कारखान्याकडून चालवण्यात येणाऱ्या मालगाडीचे काही डब्बे कारखान्याच्या परिसरात असलेल्या रुळावरून घसरले. यामध्ये रेल्वेचा काहीही संबंध नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.