Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांचं जोरदार कमबॅक; टीडीपीने १३५ जागांवर उधळला गुलाल, जगन रेड्डी यांचा पराभव

Andhra Pradesh Assembly Election TDP Chandrababu Naidu Won: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपीला बहुमत मिळालं आहे. तर मुख्यमंत्री जगन रेड्डी यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुक
Andhra Pradesh Assembly ElectionSaam Tv

लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची रणधुमाळी काल देशभरात पाहायला मिळाली. यासोबतच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. टीडीपीने १३५ जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला आहे. तर जनसेनेने २१ जागा जिंकल्या आहेत. आठ जागा जिंकण्यात भाजपला यश आलंय. सध्याचा सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागांवर विजय मिळाला आहे. लोकसभेच्या बहुतांश जागाही एनडीएकडे गेल्याचं चित्र आपण पाहिलं आहे.

निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये वापसी केली होती. चंद्राबाबू नायडू यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले होतं. एवढंच नाही तर टीडीपीने आंध्र प्रदेशातील २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही भाजपसोबत लढल्या होत्या, पण २०१९ मध्ये टीडीपी एनडीएपासून वेगळा झाला (Andhra Pradesh Assembly Election) होता.

आंध्र प्रदेशामध्ये १३ मे रोजी विधानसभेसाठी मतदान झालं होतं. १७५ जागांसाठी हे मतदान पार पडलं होतं. एकेकाळी आंध्र प्रदेशची धुरा काँग्रेस आणि तेलगू देसमच्या हातात होती. पण २००९ मध्ये वायएस राजशेखर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर त्यांचे पुत्र वायएस जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुक
Lok Sabha Election Result 2024 : मराठवाड्यात मराठा आरक्षणाची धग; महायुतीची दाणादाण, 8 पैकी केवळ 2 जागांवर विजय

परंतु आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वायएस जगन मोहन रेड्डी यांचा पराभव झाला आहे. तर टीडीपीला (TDP) सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जगन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा राज्यपाल एस अब्दुल नझीर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तर टीडीपी आणि चंद्राबाबु नायडू यांची दणक्यात वापसी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुक
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळ्यात चुरशीच्या लढतीत शोभा बच्छाव विजयी; भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com