Dhule Lok Sabha Election 2024 : धुळ्यात चुरशीच्या लढतीत शोभा बच्छाव विजयी; भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव

Maharashtra Election 2024 Result : धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे.
Dhule Lok Sabha Election 2024
Dhule Lok Sabha Election 2024 Saam Digital

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून काही ठिकाणी अनपेक्षित निकाल पहायला मिळाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे. भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. काहीवेळ ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाली होती. मात्र त्यानंतर काही त्यानंतर काही वेळातच मतमोजणी सुरू झाली आणि भाजपचे उमेदवार भामरे हे पिछाडीवर गेले तर कॉंग्रेसच्या बच्छाव यांनी आघाडी घेतली होती.

धुळे मतदारसंघ एकेकाळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र भाजपने गेल्या तीन निवडणुकीत यावर कब्जा केला होता. त्यानंतर मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार निश्चितीसाठी मोठा कालावधी लागला होता. अंतिम टप्प्यात दहा दिवस अगोदर डॉ. बच्छाव यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराजांची मनधरणी करावी लागली. त्यात प्रचारासाठीही त्यांना कमी अवधी मिळाला.

मात्र मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघासह व अन्य पाच मतदारसंघातील मुस्लिम बांधवांनी ही निवडणूक हातात घेऊन जोमाने प्रचार केला आणि त्याला यश आलं. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात ६८ टक्केहून अधिक २ लाख ५ हजार ७५९ मतदान झालं. त्यात एमआयएम व वंचित आघाडीचे उमेदवार नसल्याने काॅंग्रेसच्या पथ्यावर पडला.

Dhule Lok Sabha Election 2024
Beed Lok Sabha Election Result : मोठी बातमी! बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का; बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी

या मतदारसंघात विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे हे सलग तिसऱ्यांदा नशिब अजमावत रिंगणात उतरले होते. प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी मतदानामुळे चुरशीची लढत पहायला मिळाली. अखेर शोभा बच्छाव यांचा यांनी सुभाष भामरे यांचा पराभव केला.

Dhule Lok Sabha Election 2024
Nandurbar Lok Sabha Election Result : काँग्रेसने नंदुरबारचा बालेकिल्ला पुन्हा मिळवला; भाजपच्या हिना गावित यांचा गोवाल पाडवी यांनी केला दारून पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com