Beed Lok Sabha Election Result : मोठी बातमी! बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का; बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी

Bajrang Sonawane Won From Beed Lok Sabha Constituency : बीडमध्ये भाजप धक्का बसला असून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.
Beed Lok Sabha Election Result
Beed Lok Sabha Election ResultSaam Digital

विनोद जीरे

लोकसभा निवडणुकीत अनेक जांगावर अनपेक्षित निकाल पहायला मिळत आहेत. बीडमध्येही भाजपला धक्का बसला असून पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजय झाले आहेत. पंकजा मुंडे यांना 674984 मतं मिळाली तर बजरंग सोनवणे यांना 681569 मतं मिळाली आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे सुरुवातीपासून आघाडीवर होत्या. मात्र जवळपास २५ सा व्या फेरीनंतर बजरंग सोनवणे यांनी अचानक आघाडी घेतली. २९ ३० व्या फेरी पुन्हा पंकजा मुंडेंनी ६५० मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. पंकजा मुंडेंनी आक्षेप घेत फेर मतदानाची मागणी केली होती. मात्र तरीही पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्याने पंकजा मुंडेंना त्यांचे चुलत बंधु धनंजय मुंडे याचा पाठिंबा मिळाला होता. पंकजा ताईंसाठी प्रचारदेखील केला. बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये मात्र महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात खरी लढत पहायला मिळाली.

Beed Lok Sabha Election Result
Nandurbar Lok Sabha Election Result : काँग्रेसने नंदुरबारचा बालेकिल्ला पुन्हा मिळवला; भाजपच्या हिना गावित यांचा गोवाल पाडवी यांनी केला दारून पराभव

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ. बीडच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षण आंदोलन, मराठाविरुद्ध ओबीसी, मराठा- वंजारी वाद, अशा विविध मुद्यांमुळे बीडने अख्या राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र देशात लागलेल्या अनपेक्षित निकालांप्रमाणे बीडमध्येही शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला आहे.

Beed Lok Sabha Election Result
Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात तुतारी वाजली; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com