लोकशाहीसाठी हा घातक दिवस! सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे संतापले, थेट दिल्लीतून दिला इशारा

Amit Thackeray : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हलवल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी या कारवाईला लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.
Amit Thackeray
Amit Thackeray
Published On

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे (MNS) ने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर हे स्वतः जंतर-मंतरवर दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला. दिल्लीमधून त्यांना सरकारला थेट इशारा दिला.

एवढा मोठा माणूस, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ ज्याने देशातील विद्यार्थी, शेतकरी आणि सैनिकांसाठी इतके मोठे काम केले आहे, त्यांना अशा प्रकारे आंदोलनावरून बळजबरीने उचलून नेणे हा आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आजचा हा दिवस काळा दिवस आहे, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर घणाघाती आरोप केला.

Amit Thackeray
Crime News: रात्री कुटुंबानं काय केलं? पती-पत्नीसह ३ मुलांचा संशयास्पद मृत्यू; कारण वाचून थरकाप उडेल

अमित ठाकरे हे आंदोलक सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी गेले होते; मात्र प्रकृतीचे कारण दाखवत दिल्ली पोलिसांनी सकाळीच वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून रुग्णालयात हलवले. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी हलवल्यानंतर, त्यांच्या जागी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेले अभिजीत दीपके यांची अमित ठाकरे यांनी भेट घेतली आणि सकाळपासूनच्या घडामोडींची माहिती घेतली.

Amit Thackeray
लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे 'व्यभिचार' नाही, कोर्टाचा पतीला मोठा झटका; पोटगीबाबत महत्त्वाचा निर्णय

अमित ठाकरे म्हणाले, आम्ही दिल्लीत लँड होताच कळाले की सोनम वांगचुक सरांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यानंतर जे व्हिडिओ समोर आले ते धक्कादायक आहेत. काही लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, आम्ही डॉक्टर आहोत असे सांगितले. त्यांनी आंदोलकांसमोर पांढरा पडदा धरला आणि वांगचुक सरांना बळजबरीने उचलून घेऊन गेले.

Amit Thackeray
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून बळजबरीने उठवले; आता मराठी तरुणाचे दिल्लीत अन्नत्याग आंदोलन सुरू

राज ठाकरेंचा सरकारवर प्रहार:

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर (X पोस्ट) थेट सरकारवर निशाणा साधला आहे. "गेल्या २० दिवसांपासून एक व्यक्ती उपोषणाला बसली असताना सरकार चर्चाही करत नाही, सरकार पाषाणहृदयी झाले आहे का? ही पूर्णपणे दडपशाही आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Amit Thackeray
Dhule Accident: देव दर्शनाहून येताना भीषण अपघात; दुभाजक तोडून कार ट्रकवर धडकली, नाशिकच्या २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com