Dhule Accident: देव दर्शनाहून येताना भीषण अपघात; दुभाजक तोडून कार ट्रकवर धडकली, नाशिकच्या २ जणांचा मृत्यू, ५ गंभीर

Nashik family car crashes into truck : अजमेर येथून देवदर्शन करून नाशिकला परतणाऱ्या कुटुंबाच्या इनोव्हा कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला.
Nashik family car crashes into truck
Nashik family car crashes into trucksaam
Published On

भूषण अहिरे, धुळे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Dhule Mumbai Agra Highway accident today : अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या कारला धुळे जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुभाजक तोडून कार ट्रकवर आदळली

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेरला देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली ही कार वेगाच्या भरात थेट महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घुसली आणि समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली.

Nashik family car crashes into truck
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून बळजबरीने उठवले; आता मराठी तरुणाचे दिल्लीत अन्नत्याग आंदोलन सुरू

कारचा चक्काचूर

ही धडक इतकी भयंकर होती की, यामध्ये इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढत मदतकार्य राबवले.

Nashik family car crashes into truck
लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे 'व्यभिचार' नाही, कोर्टाचा पतीला मोठा झटका; पोटगीबाबत महत्त्वाचा निर्णय

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवदर्शनाहून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पूर्ववत केली.

Nashik family car crashes into truck
Gold Rate Today : आज सोन्याचे दर घसरले की वाढले? जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेटचे आजचे भाव
Nashik family car crashes into truck
Crime News: रात्री कुटुंबानं काय केलं? पती-पत्नीसह ३ मुलांचा संशयास्पद मृत्यू; कारण वाचून थरकाप उडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com