म्यानमारमधील लष्कर सैनिक भारतात घुसत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही देशांच्या सीमेरेषेविषयी मोठी घोषणा केलीय. म्यानमारमधून होणाऱ्या घुसखोरी आणि दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे. दोन्ही देशांच्या सीमेरेषेवर कुंपण उभारले जाणार असल्याचं शहा म्हणाले. अमित शहा आसाम पोलीस कमांडो पासिंग आउट परेडच्या कार्यक्रमात बोलत होते.(Latest News)
काही दिवसांपूर्वी म्यानमारमधील सैनिक आणि तेथील अरकान आर्मी (एए) या जातीय सशस्त्र गटाचे अतिरेक्यांमध्ये चकमक झाली होती. अरकान आर्मीचे अतिरेक्यांनी लष्कराच्या छावण्यांवर कब्जा केला होता, त्यावेळी म्यानमारचे ६०० सैनिक (Soliders) भारतात पळून आले होते. अद्यापही म्यानमारचे लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये (Terrorist) संघर्ष सुरू असून म्यानमार आपला जीव वाचवण्यासाठी भारतात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या तीन महिन्यांत म्यानमार लष्कराचे सुमारे ६०० सैनिक भारतात दाखल झालेत. पश्चिम म्यानमारमधील रखाईन राज्यातील लष्काराच्या छावण्यांवर अरकान आर्मी (एए) या जातीय सशस्त्र गटाच्या अतिरेक्यांनी कब्जा केलाय. त्यानंतर म्यानमारच्या सैनिकांनी मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिलीय.
यामुळे दोन्ही देशातील सीमेवर कुंपण घातले जाणार आहे. सीमेवर कुंपण घातल्याने भारत दोन्ही देशांमधील फ्री मूव्हमेंट रेजिम (FMR)बंद होणार आहे. यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी लवकरच व्हिसाची गरज लागणार आहे. दरम्यान भारत-म्यानमार सीमेवर राहणाऱ्या लोकांमधील कौटुंबिक आणि जातीय संबंधांमुळे १९७० च्या दशकात FMR आणण्यात आले होते.
दरम्यान, आसाम पोलीस कमांडो पासिंग आउट परेडमध्ये बोलताना शहा म्हणाले, म्यानमार आणि भारताची सीमारेषे खुली आहे. या सीमेवर बांगलादेशच्या धर्तीवर कुंपण बसवून ते सुरक्षित करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील मुक्त ये-जा करण्याच्या (फ्री मुव्हमेंट) करारावरही सरकार पुनर्विचार करत आहे. दोन्ही देशातील दळणवळणच्या सुविधा बंद होणार आहे.
म्यानमारमधील लष्कर सैनिक मिझोरामध्ये शिरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री लालदुहोमा यांच्यासोबत शिलाँगमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. मिझोराम राज्यात आश्रय घेतलेल्या म्यानमार सैनिकांना लवकरात लवकर माघारी पाठवावे, यावर शहा यांनी जोर दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.