US-UK airstrikes against Houthi : अमेरिका-ब्रिटनचा हुथी बंडखोरांवर एअरस्टाईक; पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता

US-UK airstrikes against Houthi : इस्त्रायल-हमास युद्धानंतर हुथी बंडखोर पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेवर परिणाम होत होता.
US-UK airstrikes against Houthi
US-UK airstrikes against HouthiSaam TV
Published On

US-UK airstrikes against Houthi :

लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमध्ये अनेक ठिकाणी हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत कठोर कारवाई केली आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये हुथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव आणखी वाढू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हाईट हाऊसने इराण समर्थित हुथी बंडखोरांवर केलेल्या हल्ल्याची पुष्टी करणारे एक पत्रक जारी केले. इस्त्रायल-हमास युद्धानंतर हुथी बंडखोर पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेवर परिणाम होत होता.

अमेरिकन नौदलाने अनेक वेळा हुथी बंडखोरांचे हल्ले हाणून पाडले होते. हे हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे मोठे परिणाम होतील, असा इशाराही अमेरिकेने दिला होता. आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेनेही पाळत ठेवली होती. हुथी बंडखोर आणि समुद्री चाच्यांचे हल्ले रोखण्यासाठी भारताने आपल्या पाच युद्धनौका अरबी समुद्र आणि लाल समुद्रात तैनात केल्या आहेत. (Latest Marathi News)

US-UK airstrikes against Houthi
PM Narendra Modi Nashik Visit: 12 बॉम्ब स्क्वॉड, प्रचंड पोलीस बंदोबस्त; असा असेल PM नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा

अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, 'गेल्या महिन्यात लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, अमेरिकेने 20 हून अधिक देशांसह ऑपरेशन लाँच करून व्यापारी जहाजांना हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांपासून वाचवले.

गेल्या आठवड्यात, 13 मित्र देशांसह आम्ही हुथी बंडखोरांना एक इशारा जारी केला आणि सांगितले की जर त्यांनी व्यापारी जहाजांवर हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील. हुथी बंडखोरांविरुद्ध आजचे हवाई हल्ले हा एक स्पष्ट संदेश आहे.

US-UK airstrikes against Houthi
Indian Passport: भारतीय नागरिक व्हिसाशिवाय जगातील या 62 देशांना देऊ शकता भेट, पाहा संपूर्ण लिस्ट

हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. इस्रायल-हमास युद्धापासून, हुथी बंडखोर लाल समुद्र आणि अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांवरून जाणाऱ्या जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्ग विस्कळीत होत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हौथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे, गेल्या काही महिन्यांत लाल समुद्रातून सुमारे 200 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. यामुळे जगात महागाई वाढण्याची भीती आहे. मात्र, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायल-हमास युद्धामुळे आधीच तणावाचा सामना करणाऱ्या पश्चिम आशियामध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची भीती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com