PM Narendra Modi Nashik Visit: 12 बॉम्ब स्क्वॉड, प्रचंड पोलीस बंदोबस्त; असा असेल PM नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा

PM Narendra Modi Nashik Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नाशिकमध्ये रोड शो होणार असून प्रचंड बंदोबस्त ठेवण्याच येणार आहे. तब्बल अडीच हजार पोलीस, एसआरपीएफ ५ तुकड्या, १२ बॉम्ब शोधक आणि नाशक पथके, एसपीजी कमांडो असा पोलीस बंदोबस्त आतापासूनच रोड शो च्या मार्गावर तैनात करण्यात आला आहे.
PM Narendra Modi Nashik Visit
PM Narendra Modi Nashik VisitSaam Digital
Published On

(अभिजीत सोनावणे)

PM Narendra Modi Nashik Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नाशिकमध्ये रोड शो होणार असून प्रचंड बंदोबस्त ठेवण्याच येणार आहे. तब्बल अडीच हजार पोलीस, एसआरपीएफ ५ तुकड्या, १२ बॉम्ब शोधक आणि नाशक पथके, एसपीजी कमांडो असा पोलीस बंदोबस्त आतापासूनच रोड शो च्या मार्गावर तैनात करण्यात आला आहे. तर मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक देखील अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

नाशिकमधील हॉटेल मिरची चौक ते तपोवन मैदानापर्यंत तब्बल २ किलोमीटरचा हा रोड असणार आहे. या रोड शोमध्ये नाशिक ढोल पथक आणि आदिवासी कलाकारांकडून पारंपरिक नृत्य सादर केलं जाणार आहे.

रामकुंडावर मोदींच्या हस्ते गंगा-गोदावरीचं जलपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर येत असून यावेळी शहरात त्यांचा रोड शो ही होणार आहे. नरेंद्र मोदींचं सकाळी ११.३० वाजता नाशिक मध्ये आगमन. त्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर मोदींच्या हस्ते गंगा गोदावरीचं जलपूजन आणि छोटीशी आरती पार पडेल. गोदा घाटाची पाहणी देखील मोदी करणार आहेत.

दुपारी १२ च्या दरम्यान नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन, पूजा आणि आरती, भावार्थ रामायणाचा पाठ करतील. काळाराम मंदिरातून पंतप्रधान मोदी हॉटेल मिरची चौकाकडे रवाना होतील. मिरची हॉटेल चौक ते तपोवन मैदानापर्यंत मोदींचा रोड शो होईल. या रोड शो मध्ये नाशिक ढोल आणि पारंपारिक नृत्य सादर करून पंतप्रधानांचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात येणार आहे. रोड शो नंतर मोदी 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन करतील. याच ठिकाणी तपोवन मैदानावर मोदींची सभा पार पडणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi Nashik Visit
Clean City Survey: शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र नंबर १., या शहराने पटकवला पहिला क्रमांक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तातडीच्या नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नाशिकमध्ये जाऊन दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनाची पाहणी करणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकाला तातडीने रवाना झाले असून तयारीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नाशिक पोलिसांनी नोटीसा बजावल्या नोटीसा बजावल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

PM Narendra Modi Nashik Visit
MLA Disqualification Result: अपात्रता निकालानंतर शिंदेंची 'पॉवर' वाढली, ठाकरे गटाचा 'कार्यक्रम' ठरला; मातोश्रीवर मोठा प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com