Pakistan : अमेरिका करणार पाकचं 'अण्वस्त्र'हरण, USA च्या मास्टरप्लॅननं पाकड्यांची तंररली

Special Report : अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रांवर आता अमेरिकेनं ताबा मारण्याची गुप्त योजना आखलीय.. मात्र ही योजना काय आहे? पाकिस्तानला अण्वस्त्रांची धमकी कशी अंगलट येणार आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
special report
special reportsaam tv
Published On

तारीख 6 आणि 9 ऑगस्ट 1945.....

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण मानवजात हादरुन गेली... लाखोचा जीव गेला आणि दोन पिढ्या अपंग झाल्या... आता तीच भीती पुन्हा सतावू लागलीय... त्याला कारण ठरलंय दहशतवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकिस्तानकडून भारताला दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र युद्धाच्या धमक्या आणि पाकची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा धोका...त्यामुळेच भारतानं पाकची अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय समुदायानं ताब्यात घेण्याची मागणी केलीय...

एकीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेला पाकिस्तान अण्वस्त्रांच्या धमक्या देतोय...तर दुसरीकडे थेट अमेरिकेनं पाकची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची रणनीती आखलीय....मात्र अमेरिकेची ही गुप्त रणनीती नेमकी काय आहे? पाहूयात...

- पाकमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका

- पाकमधील अण्वस्त्र ताब्यात घेण्याबाबत अमेरिका राबवणार 2011 चा प्लॅन

- अण्वस्त्र ताब्यात घेण्यासंदर्भात अमेरिकेचा स्नॅच अँड ग्रॅब गुप्त प्लॅन

- सॅटेलाईट इमेज, गुप्तहेर एजन्सी, सिग्नल एजन्सीचा करणार वापर

- अमेरिकेची डेल्टा फोर्स, नेव्ही सील्स पाकमध्ये घुसून अण्वस्त्र ताब्यात घेणार

special report
Shocking News : अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबली अन्...; दोन लेकरांसमोर आई जग सोडून गेली

दुसऱ्या महायुद्धानंतर वर्चस्वाच्या स्पर्धेतून अनेक देशांनी अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या..आता अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा टोकाला गेलीय..ज्याच्याकडे जास्त अण्वस्त्र तो शक्तीशाली, अशी नवी व्याख्या तयार व्हायला लागलीय...तर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानं पाकने भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यास सुरुवात केलीय... मात्र भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय...

special report
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, हादरवणारा व्हिडीओ समोर

खरंतर भारतानं अण्वस्त्रांची निर्मिती केली असली तरी त्याचा वापर स्वसंरक्षणासाठीच करणार, अशी भूमिका भारतानं पहिल्यापासूनच घेतली आहे.मात्र आडमुठ्या पाकमुळं अणुयुद्धाची ठिणगी पडल्यास भारत सडेतोड उत्तर देईल हे निश्चित. त्यामुळेच हिरोशिमा आणि नागासाकीच्या राखेतून निर्माण झालेली शांतता धोक्यात येण्यापुर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकची अण्वस्त्र ताब्यात घ्यायला हवीत...

special report
Pune News : पुणे पोलीस आयुक्तांचा मारणे टोळीला दणका, गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com