Amravati News
Amravati NewsSaam Tv

Shocking News : अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबली अन्...; दोन लेकरांसमोर आई जग सोडून गेली

Amravati News : अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील कावली वसाड येथे वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसापासून वाचण्यासाठी ही महिला झाडाखाली थांबली होती.
Published on

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल होत असल्याचे पाहायला मिळते. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीठाचा वर्षाव होत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वीज कोसळल्याचा घटना घडत आहेत. अमरावतीत वीज पडून एका महिलेला मृत्यू झाला, तर या महिलेची दोन लहान मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील कावली वसाड येथील शेतात ही घटना घडली आहे. ही महिला पावसापासून बचाव करण्यासाठी तिच्या मुलांसह झाडाखाली थांबली होती. तेव्हा अचानक वीज कडकडली. यात महिलेचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या मुलांना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले.

Amravati News
जिथे नावाचा स्टॅन्ड; तिथेच रोहित शर्माने लगावलेला फटका जाणं हे भाग्याचं, मुख्यमंत्री फडणवीसांची इच्छा

मृत महिला शेतात काम करत होती. तेव्हा अवकाळी पावसाची हजेरी लागली. अचानक पाऊस पडायला सुरुवात झाल्याने तिने मुलांसह झाडाखाली आसरा घेतला. पण तेव्हा वीजेमुळे महिलेला तिचा जीव गमवावा लागला. सुदैवाने तिची दोन्ही मुलं वाचली, त्यांच्यावर सध्या धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Amravati News
8 कोटींची कॅश अन् 23 कोटींचं सोनं...; वसई विरार मनपा अधिकारी ईडीच्या जाळ्यात सापडला, मोठा घोटाळा समोर आणला

वीज कोसळून शिक्षकाचा जागीच मृत्यू

नांदेडमध्ये काल दुर्घटना घडली. दुचाकीवरुन जात असताना वीज कोसळून एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. खिशातील मोबाइलफोनचा डेटा चालू असल्याने वीज कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नांदेडच्या माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात काल (१५ मे) दुपारी ही घटना घडली.

Amravati News
दारु पिऊन नवरा बनला सैतान; बेदम मारहाण करुन बायकोला छतावरुन उलटं लटकवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com