America Plane Crash: ६० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश, लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरला धडक, अपघाताचा थराराक VIDEO व्हायरल

Passenger Flight Crashed In America: अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊसच्या जवळ विमानाला अपघात झाला. रोनाल्ड रिगल इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमानाने हेलिकॉप्टरला धडक दिली. या विमानात ६० जण प्रवास करत होते.
America Plane Crash: ६० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश, लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरला धडक, अपघाताचा थराराक VIDEO व्हायरल
America Plane CrashSaam Tv
Published On

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये मोठी दुर्घटना घडली. प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. लँडिंग करताना प्रवाशांनी भरलेले विमान हेलिकॉप्टरला धडले. अपघातानंतर विमान नदीमध्ये पडले. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या विमानातून ६० प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊसच्या जवळ विमानाला अपघात झाला. रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमानाने हेलिकॉप्टरला धडक दिली. अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीमध्ये पडले. हा अपघात हेलिकॉप्टरला धडक दिल्यामुळे झाला. हे विमान अमेरिकेतील कंसास सिटीवरून वॉशिंगटनला येत होते. कॅनडा एअरचे हे विमान होते.

अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीमध्ये पडले. विमानामध्ये ६० प्रवासी होते. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. ज्या हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली ते हेलिकॉप्टर अमेरिका लष्कराचे होते. या अपघातानंतर रील नॅशल एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. ही घटना घडली त्या एअरपोर्ट आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त ३ किलोमीटरचे अंतर आहे.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्येच उपस्थित होते. हा अपघात आहे की घातपात याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोटोमॅक नदीमध्ये बर्फ तयार झाला आहे त्यामुळे प्रवाशांची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

America Plane Crash: ६० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश, लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरला धडक, अपघाताचा थराराक VIDEO व्हायरल
America Wild Fire : ३०० कोटींचा बंगला जळून खाक, अमेरिकेत चाललंय तरी काय? पाहा थरकाप उडवणारा Video

रिगन एअरपोर्टवर विमान उतरताना हेलिकॉप्टरला कसे धडकले हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणआऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर सर्व विमान उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. टक्कर झाल्यानंतर विमानाने पेट घेतला. आकाशामध्ये आगीचा गोळा बनल्याचे चित्र व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमान आणि हेलिकॉप्टरच्या धडकेनंतर आकाशात ठिणग्या उडाल्या.

America Plane Crash: ६० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश, लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरला धडक, अपघाताचा थराराक VIDEO व्हायरल
America: अमेरिकेकडून पाकिस्तानला मोठा झटका, ४ क्षेपणास्त्र कंपनीवर लावले निर्बंध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com