
Los Angeles Wild Fire : अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामध्ये मंगळवारी (७ जानेवारी) भीषण आग लागली. जंगलात एकाच वेळी लागलेल्या आगीमुळे अनेकांचे नुकसान झाले. बरेचसे लोक आगीच्या ज्वालांमध्ये अडकले. आगीचे प्रमाण वाढत गेल्याने हॉलिवूड हिल्सपर्यंत आग लागली. भडका उडाल्याने अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरे जळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आगीत ३०० कोटी रुपये किंमत असलेला बंगला जळून खाक झाला आहे.
कॅलिफॉर्नियामधील लॉस एंजेलिसमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले. याच सुमारास एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तब्बल ३०० कोटी रुपये (३५ मिलियन डॉलर) किंमत असलेला बंगला आगीच्या विळख्यात असल्याचे पाहायला मिळाले. व्हिडीओत आलिशान बंगल्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत असे दिसते. यावरुन तेथील आगीची दाहकता किती असेल याचा अंदाज येतो.
मंगळवारी सुरु झालेल्या अग्नितांडवामध्ये किमान पाच लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. १,००,००० पेक्षा जास्त लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. आगीत दीड हजारांहून अधिक इमारती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर १०८ वर्म किलोमीटरहून जास्त क्षेत्र जळून खाक झाले आहे.
लॉस एंजेलिस हे कॅलिफॉर्नियामधील शहर हॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे केंद्र आहे. भीषण आगीमुळे हॉलिवूडवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. आगीत पॅसिफिक पॅलिसेड्स, पासाडेना, अल्टाडेना आणि हॉलिवूड हिल्स अशा जागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे जळाली आहेत. हवेमुळे आगीचा प्रभाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
हवेच्या प्रभावामुळे आगीवर नियंत्रण मिळवल्यास अग्निशमन दलाला अडचण येत आहे. मंगळवारी सुरु झालेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चार दिवसांपासून सुरु आहेत. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाकडून हॅलिकॉप्टरद्वारे पाण्याचा मारा केला जात आहे. एखादा स्फोट वाटावा असे वातावरण कॅलिफॉर्नियामध्ये झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.