High Court : विवाह नोंदणी करताना वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड ग्राह्य धरता येणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय!

Allahabad High Court News : विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा टीसी वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. जाणून घ्या.
Allahabad High Court marriage registration age proof guidelines
Allahabad High Court marriage registration age proof guidelinesAI Image
Published On: 
Summary
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवाह नोंदणीतील वय पडताळणी प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले

  • केवळ आधार कार्डाच्या आधारे जन्मतारीख किंवा वय निश्चित करता येणार नाही

  • शाळा सोडल्याचा दाखला वयाचा पुरावा म्हणून स्वीकारण्यावर मर्यादा

  • नव्या नियमांनुसार शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मनोंद किंवा जन्मदाखला तपासला जाऊ शकतो.

एखाद्या नवविवाहित वधू वराची विवाह नोंदणी करताना वयाचा पुरावा दाखवायचा झाल्यास आता फक्त आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC ग्राह्य धरली जाणार नाही. असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान दिले आहेत. बालविवाहाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने नऊ महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. न्यायमूर्ती तेज प्रताप तिवारी यांनी दीपक पाल यांच्या अपीलवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

सुनावणीदरम्यान नोंदणी विभागाचे एआयजी अमिताभ कुमार यांनी संबंधित विवाहाची नोंदणी आधार कार्ड आणि टीसीच्या आधारे झाल्याची कबुली दिली. जन्मतारखेची आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्याचेही त्यांनी मान्य केले. याप्रकरणी अधिकाऱ्याने माफीनामा सादर करून भविष्यात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले.

Allahabad High Court marriage registration age proof guidelines
Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

न्यायालयाने स्पष्ट केले की, आधार कार्ड हे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी उपयुक्त असले, तरी ते जन्मतारखेचा वैध कायदेशीर पुरावा मानता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयांचा आणि UIDAI च्या माहितीचा संदर्भ देत न्यायालयाने वय पडताळणीसाठी नियमांचे पालन करण्यावर भर दिला.

Allahabad High Court marriage registration age proof guidelines
Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

कायद्यानुसार वय निश्चित करण्यासाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा शाळेतील जन्मनोंद, नगर पंचायतीचा जन्मदाखला आणि आवश्यक परिस्थितीत हॉस्पिटलचं सर्टिफिकेटचा आधार घेतला जाऊ शकतो. टीसीचा स्वतंत्रपणे कायदेशीर पुरावा म्हणून स्वीकार करण्यास मर्यादा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. विवाह नोंदणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून बालविवाह रोखण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. कायद्यानुसार विवाहासाठी वराचे वय २१ वर्षे आणि वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com