VIDEO : सुनेत्रा पवार यांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ, पाहा व्हिडिओ

Sunetra Pawar takes oath in Marathi : सुनेत्रा पवार यांनी आज, मंगळवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
Sunetra Pawar took oath as a rajya Sabha MP
Sunetra Pawar took oath as a rajya Sabha MPSAAM TV
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज, मंगळवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांनी मराठीतून शपथ घेतली. दुसरीकडे, नव्या संसदेतील लोकसभेच्या भव्य दालनात महाराष्ट्रातील इतर खासदारांनीही शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढल्या होत्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे होत्या. सुप्रिया सुळेंकडून त्यांचा पराभव झाला होता.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून १८ जून रोजी राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या जागेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Latest News) यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर बारामतीतून आता तीन खासदार झाले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार देखील राज्यसभेचे सदस्य आहेत.

बारामतीतून लढवली होती लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) नुकतीच झाली. या निवडणुकीत बारामती मतदारसंघावर अवघ्या देशाची नजर होती. कारण येथून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये थेट लढत झाली होती. सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल लोकसभेवर निवडून गेल्यानं राज्यसभेत एक जागा रिक्त होती. या जागेवर महायुतीने बारामतीमध्ये अजित पवारांचं वर्चस्व कायम राहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुनेत्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने सुनेत्रा यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

Sunetra Pawar took oath as a rajya Sabha MP
Sanjay Raut: रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून थांबवा, मतमोजणीचे CCTV समोर आणा; संजय राऊत कडाडले

बारामतीचा निकाल काय?

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात त्यांच्याच कुटुंबातील सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. ४ जून रोजी लोकसभा निवडणूक निकाल घोषित झाले. सुप्रिया सुळे यांना ७, ३२,३१२ मते, तर सुनेत्रा पवार यांना ५,७३,९७९ मते मिळाली. सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला होता.

Sunetra Pawar took oath as a rajya Sabha MP
Nilesh Lanke Oath : निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंना विखारी टोला, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com