Sanjay Raut: रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून थांबवा, मतमोजणीचे CCTV समोर आणा; संजय राऊत कडाडले

Thackeray Group Leader Sanjay Raut Criticized On BJP: संजय राऊतांनी ईव्हीएम मशिन गैरवापर प्रकरणी महायुतीवर टीका केलीय. उत्तर पश्चिम मतदारसंघातील रविंद्र वायकरांच्या विजयावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
संजय राऊत
Sanjay RautSaam Tv

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांचा झालेला विजय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातील घोटाळा हा देशातील निवडणूक घोटाळातला आदर्श घोटाळा असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक यंत्रणा हातात घेतली, जिथे जय पराजय दिसत होते तिथे अशा प्रकारे घोटाळे करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर पुन्हा दोन तास मतमोजणी करण्यात (Thackeray Group Leader Sanjay Raut) आली. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, असं एलन मस्क सांगत आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास जाणून घ्यावा. वंदना सूर्यवंशी यांचा मोबाइलसुद्धा जप्त करावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

वायकर यांचा जवळचा माणूस निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा वनराई पोलीस स्टेशनमध्ये का चक्करा मारत होता? असा सवाल राऊतांनी केला आहे. आता फॉरेन्सिक लॅबमध्ये मोबाइल पाठवत (Mumbai North West Constituency) आहेत. या लॅबचे प्रमुख फडणवीस, नंतर एकनाथ शिंदे आहेत. यामधून काय अपेक्षा करणार? असं संजय राऊत म्हणाले आहेत. वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा संपूर्ण निकाल रहस्यमय असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

संजय राऊत
Sanjay Raut On Elections: आगामी निवडणुकीबाबत शंका नाही, राऊतांचं मोठं वक्तव्य

देशात असे ४५ निकाल लागले आहेत. त्यावर भाजपने (BJP) आपला सरकार आणले असल्याची खोचक टीका संजय राऊतांनी विरोधकांवर केलीय. वायकर हरलेले आहेत. लोकशाही आपल्याला वाचावायची असेल तर वायकर यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे. खासदारकीची शपथ घेण्यापासून वायकर यांना थांबवावं. अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं ( Sanjay Raut) आहे. पैशाचा वारेमाप वापर झाला. फक्त ४८ हजार मतांनी राणे यांचा विजय झाला. त्यांना मंत्रिपद का मिळाला नाही याचा विचार करावा, अशी टीकाही राऊतांनी केलाय.

संजय राऊत
Sanjay Raut News: मोहन भागवत मणिपूर, काश्मीरमध्ये गेलेत का? संजय राऊतांचा सवाल; मोदी- शहांवर टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com