रोहित कदम, साम टीव्ही
एक काळ असा होता जेव्हा इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांना हमखास गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळायची. मात्र, जसजसं तंत्रज्ञानात बदल होत गेले, तसतसं एआय तंत्रज्ञानाची उत्पत्ती झाली. आणि याच एआयमुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरी देणाऱ्या इंजिनिअर्सवर मोठं संकट निर्माण झालंय. आयटी क्षेत्रात आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट आलं असून सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचे वर्चस्व धोक्यात आलंय. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एका अहवालात यासंदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
कोविड-19 काळात, तंत्रज्ञान कंपन्यांनी बेछूटपणे नोकरभरती केली. ज्याला आता अतिभरती सुधारणा म्हणत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणल्या जात आहेत. तसंच, कंपन्यांनी तेव्हा गरजेपेक्षा जास्त अभियंत्यांची भरती केली होती, त्यामुळे आता खर्च कमी करण्यासाठी कंपन्या सातत्याने कर्मचारी कपात करत आहेत. या नोकर कपातीतील धक्कादायक बाब म्हणजे गिटहब कोपायलट आणि इतर जनरेटिव्ह एआय कोडिंग साधनांमुळे आयटी कंपन्यांमध्ये इंजिनिअर नियुक्तीत तब्बल 70 टक्क्यांपर्यंत घट झालीये.
खरंतर, एआयमुळे जगातील सर्व क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं संकट ओढावलंय. त्यामुळे पुढील काळात जगभरातील नोकरदारांसमोर एआय हे मुख्य आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षात फक्त 3 महिन्यांत दीड लाख नोकऱ्या गेल्याचं नुकतंच समोर आलं होतं. त्यामुळे कधी काळी ज्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची जगभरात प्रचंड मागणी होती, आज त्याच इंजिनिअर्ससमोर एआयनं मोठं आव्हान उभं केलंय, हे एव्हढं मात्र निश्चित....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.