3 महिन्यात गेल्या दीड लाख नोकऱ्या, आयटी कंपन्यांकडून नोकरकपात

Job Crisis Deepens as IT Giants Cut Workforce Amid AI Boom: गेल्या 3 महिन्यात तब्बल दीड लाख जणांच्या नोकऱ्या गेल्यात. आयटी कंपन्यांकडून नोकरकपात का सुरु आहे? बेरोजगारीचं संकट आयटी क्षेत्रावर कसं घोंगावू लागलंय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Mass layoffs sweep across global tech companies as AI-driven automation reshapes the future of jobs.
Mass layoffs sweep across global tech companies as AI-driven automation reshapes the future of jobs.saam tv
Published On

एआयमुळे जगावर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललेलं असतानाच जागतिक आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारवर्गामध्ये मोठी खळबळ उडालीये. जागतिक आयटी आणि टेक क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक ठरतंय. कारण, सिलिकॉन व्हॅलीपासून ते भारतीय आयटी हबपर्यंत, जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये यंदा नोकरकपातीचं सत्र सुरू आहे. लेऑफ ट्रॅकर्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 210 हून अधिक टेक कंपन्यांनी 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय. विशेष म्हणजे, टेक कंपन्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या वापराला प्राधान्य देतायेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करणाऱ्या जगातल्या आघाडीच्या टेक कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात...

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकल(Oracle)ने आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपातीची घोषणा केलीये. कंपनीने क्लाऊड आणि एंटरप्राईझ सॉफ्टवेअर डिव्हिजनमधून तब्बल 30,250 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. तर अॅमेझॉननं कॉस्ट-कटिंग आणि लॉजिस्टिक्स विभागात एआय-आधारित ऑटोमेशन टूल्सचा वापर वाढवलाय. अॅमेझॉननं आतापर्यंत आपल्या वेगवेगळ्या विभागांतून सुमारे 19,100 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.

मेटा कंपनीनं तब्बल 145 अब्ज डॉलरच्या अवाढव्य एआय इन्फ्रास्ट्रक्चर बजेट जाहीर केलंय. या बजेटसाठी मेटानं 16,900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. तर दुसरीकडे, एआय इंजिनिअरिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोसॉफ्टनंदेखील यंदा 8,750 पेक्षा जास्त नोकरकपात केलीये.

एआयचा वाढत्या वापरामुळे पुढील काळात टेक कंपन्यांकडून आणखी नोकरी कपात करण्याची शक्यता आहे. नोकरी कपातीमागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात तेही पाहूयात...

आयटी क्षेत्रावर मंदीचं सावट?

एआयच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक काम होतं. एआयचं काम तुलनेत अधिक वेगवान आहे. नफ्याचा वाढता दबाव आणि ग्राहकांची बदलती प्राधान्ये हेदेखील कारणीभूत आहेत.

खरंतर, एआयच्या वाढत्या वापरामुळे आयटी कंपन्यांमध्ये आमूलाग्र बदल होताहेत. या वर्षात फक्त 3 महिन्यांत दीड लाख नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रात याच तंत्रज्ञानामुळे जगावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीये. कधी काळी ज्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची जगभरात प्रचंड मागणी होती, आज त्याच इंजिनिअर्ससमोर एआयनं मोठं आव्हान उभं केलंय, एआयचा वाढता वापर भविष्यात कुठल्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com