सरकारी नोकरी लागताच बायकोचा रुबाब वाढला; म्हणाली, तुझी लायकीच नाही, सोबत राहायचं असेल तर १ कोटी दे

Husband Wife Dispute News: उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. १ कोटी दे तरच तुझ्याोबत राहिन,असं एका बायकोने आपल्या नवऱ्याला सांगितले आहे.
Husband Wife Dispute
Husband Wife DisputeYandex
Published On

Kanpur Husband Wife Dispute : उत्तर प्रदेशातील एसडीएम ज्योती मौर्य यांचे प्रकरण आठवतेय? तसेच आणखी एक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये घडलेय. सरकारी नोकरी लागल्यानंतर पत्नीने नवऱ्याला सोडलेय. नवऱ्याचं नाव बजरंग तर सरकारी नोकरी लागलेल्या पत्नीचे नाव लक्षिता असे आहे. या दाम्पत्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, लक्षिताने नवऱ्यासोबत राहण्याच्या बदल्यात एक कोटी रूपयांची मागणी केली आहे.

Husband Wife Dispute
Ulhasnagar Crime: पत्नीला गुंगीचं औषध दिलं, नंतर अश्लील व्हिडिओ काढले; अन् मित्राला पाठवले..

बायकोसाठी त्यानं कॅनडाची नोकरी सोडली. जिवाचं रान करून बायकोला सरकारी नोकरी लावली. पण नोकरी लागल्यानंतर बायकोनं नवऱ्याला सोडल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलेय. याआधी ज्योती मौर्य हिने नोकरी लागल्यानंतर नवऱ्यासोबत वाद घातल्याचं प्रकरण घडले होतं. आताही तसाच काहीसं समोर आलेय. कानपूरमध्ये सरकारी नोकली लागल्यानंतर पत्नीने नवऱ्याला सोडलेय. नवऱ्याने पत्नीच्या विरोधात कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्याने कोर्ट आणि पोलिसात दाद मागितली आहे.

२०२३ मध्ये झालं होतं लग्न -

पोलिसात पोहचलेल्या नवऱ्याने सांगितले की, पत्नी सोडून गेल्यामुळे खूप अस्वस्थ झालोय. समाजात अपमान होत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी पत्नीला घरी आणण्यासाठी मदत करावी.

कानपूरच्या नौबस्ता पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या बजरंगचे लग्न गाझियाबाद येथील लक्षितासोबत 2023 झाले होते.लग्नानंतर कानपूरला आलेल्या लक्षिताने नवऱ्याकडे शिक्षक होण्याचं स्वप्न असल्याचे सांगितले. नवऱ्याने पत्नीचे स्वप्न आपलं समजून कामाला लागला. पत्नीच्या शिक्षणाचा खर्चासाठी त्याने जिवाचे रान केले. पत्नीच्या कॉलेजपासून नोकरीच्या तयारीपर्यंत महागड्या कोचिंगसाठी पैसा त्याने जमा केला. पत्नीसाठी कॅनडाची नोकरीही सोडली.

Husband Wife Dispute
Crime News: हॉटेलच्या रुममध्ये भाऊ-बहिणीनं संपवलं जीवन; सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण

नवऱ्याच्या मदतीने लक्षिता हिचं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार झाला. पण त्यानंतर तिने नवऱ्याचं घर आणि नवरा दोघांनाही सोडून माहेर गाठलं. नवऱ्यासोबत बोलणं सोडलं. नवऱ्यानं कारण विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. नवऱ्यासोबत राहण्यास येण्यास तिने नकार दिला. सोबत राहायचे तर एक कोटी रूपये दे, अशी मागणी लक्षिताने नवऱ्याकडे केली.

नवऱ्याने पत्नीवर गंभीर आरोप लावला. माहेरी गेल्यानंतर माझ्यासोबत बोलत नाही. माझा फोनही उचलत नाही. माझ्यासोबत राहण्यासाठी तिने एक कोटी रूपयांची मागणी केली. माझ्यासोबत राहण्याची तुझी लायकी नाही, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, तू आधी मला एक कोटी दे मगच तुझ्यासोबत राहते, असे मला तिने सांगितल्याचे बजरंग याने सांगितले.

Husband Wife Dispute
R Ashwin On Hindi Language: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही...अश्विन अण्णाच्या वक्तव्यामुळे पेटला वाद; नेमकं काय म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com