Afghanistan Mosque Explosion: अफगाणिस्तानमध्ये मशिदीत मोठा बॉम्बस्फोट; मौलवींसह अनेकांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या हेरातमध्ये मशिदीत नमाज पठणावेळी बॉम्बस्फोट झाला.
Saam breaking
Saam breakingSaam Tv

Afghanistan Mosque Explosion News Update | काबुल: तालिबाननं ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तान अशांतच आहे. अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांच्या घटना वारंवार घडत आहेत. देशात पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. यात मिशिदीतील मौलवींसह इतर अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

टोलो न्यूजच्या रिपोर्टनुसार, या स्फोटात मौलवींचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील हेरात येथे शुक्रवारी मशिदीत स्फोट (Blast) झाला. मशिदीत नमाज पढण्यासाठी समाजातील नागरिक एकत्र जमले होते. त्याचवेळी स्फोट झाला.

Saam breaking
Kabul Mosque Blast : काबुलमधील मशिदीत बॉम्बस्फोट; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटामध्ये गुजरगाह मशिदीत उपस्थित मौलवींचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक जखमी झाले आहेत. (Afghanistan News)

नमाज पढतानाच मोठा आवाज झाला, अन्...

सूत्रांच्या माहितीनुसार, हेरातमधील गुजरगाह मशिदीत एक स्फोट झाला. त्यात तालिबान समर्थक मौलवींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. सूत्रांनुसार, शुक्रवारी नमाज पठणाच्या वेळी हा स्फोट झाला.

Saam breaking
Afghanistan : काबुल विमानतळावर महागाईमुळे लोकांचे खाण्यापिण्याचे हाल

टोलो न्यूजने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, मौलवींचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. हेरात गव्हर्नरचे प्रवक्तांच्या माहितीनुसार, आत्मघाती हल्ला घडवून आणण्यात आला. त्याचवेळी मशिदीच्या आतमध्ये नागरिक नमाज पठण करत होते. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची नेमकी संख्या किती आहे, हे अद्याप अधिकृतरित्या समजू शकले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com