Accident Viral Video: आधी उडाली, मग उलटली; मात्र इतक्या भीषण अपघातातून चालक वाचला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

आधी उडाली, मग उलटली; मात्र इतक्या भीषण अपघातातून चालक वाचला, पाहा व्हिडीओ
Accident Viral Video
Accident Viral VideoSaam TV

Accident Viral Video: जगात दररोज शेकडो रस्ते अपघात होत असतात. त्यापैकी काही इतके धक्कादायक असतात की ते पाहून कोणत्याही व्यक्तीला थरकाप उडू शकतो.

सध्या सोशल मीडियावर अशा घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सातत्याने व्हायरल होत आहेत. जे नेटकऱ्यांना शिकवत आहेत की, रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे.

Accident Viral Video
Kalyan Crime News: धक्कादायक! जुन्या रागातून दोन तरुणांवर भर रस्त्यात तलवारीने वार, घटना सीसीटीव्हीत कैद

अशाच एका अपघात घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भीषण अपघात झाल्याचं दिसत आहे. चालकाच्या चुकीमुळे या कारचा मोठा अपघात झाल्याचं व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार आधी उडते आणि मग दोन ते तीन वेळा उलटते. चालकाचं कारवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

Accident Viral Video
Truck Accident: दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या भीषण अपघात, २ ठार एक गंभीर

अनेकदा वाहतूक पोलीस गाडी चालवताना सीट बेल्ट लावायला सांगतात. व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) कार रस्त्यावरून उतरून साईडला जाते, तेव्हा ती कोणत्याही नियंत्रणाशिवाय हवेत फिरू लागते. यादरम्यान कारचा दरवाजा उघडतो आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे ड्रायव्हर अनेक फूट हवेत उडी मारून रस्त्यावर पडताना दिसतो.

दरम्यान, अनेक रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये असे दिसून आले आहे की सीट बेल्ट न घातल्याने लहान-मोठ्या अपघातांमध्येही लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com