माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा जोरदार झटका; विधानसभा निवडणुकीआधी दमदार महिला नेत्याचा पक्षाला रामराम

Neelima Yadav joins Congress after leaving Aam Aadmi Party: आम आदमी पार्टीला आणखी एक धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष नीलिमा यादव यांनी १२ वर्षांनंतर आपची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
NEELIMA YADAV JOINS CONGRESS | AAP SUFFERS ANOTHER SETBACK
NEELIMA YADAV JOINS CONGRESS | AAP SUFFERS ANOTHER SETBACKsaam tv
Published On: 

आम आदमी पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या आणखी एका नेत्या नीलिमा यादव यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी नीलिमा यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी देशाला काँग्रेस आणि राहुल गांधी यांची गरज असल्याचे म्हटले. लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्क्ड यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता नीलिमा यादव यांनीही आपची साथ सोडल्याने पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे.

NEELIMA YADAV JOINS CONGRESS | AAP SUFFERS ANOTHER SETBACK
Shiv Sena Case live: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टातून महत्वाची माहिती समोर; वाचा नेमकं काय घडलं?

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नीलिमा यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, आज देशाला काँग्रेस आणि राहुल गांधी यांची गरज आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष लढा देत आहे. नीलिमा यादव म्हणाल्या, मी उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीला 12 वर्षे दिली. मात्र, पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांपासून दूर गेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपली फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे. आज मी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी काँग्रेससोबत यावं, असं माझं आवाहन आहे.

NEELIMA YADAV JOINS CONGRESS | AAP SUFFERS ANOTHER SETBACK
Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली

कोण आहेत नीलिमा यादव?

नीलिमा यादव या उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच त्या आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यही आहेत. 2019 मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पक्षात तब्बल 12 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com