PM Modi News : उद्धव ठाकरे, शरद पवारांसह विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांचं PM मोदींना थेट पत्र; पत्रास कारण की....

Letter to Pm Modi : देशातील 9 विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modisaam tv

PM Narendra Modi News : देशातील 9 विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी इडी, सीबीआय सारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे सरकारी यंत्रणांची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप देखील या पत्रात करण्यात आला आहे.

पत्रात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधातील तपास संथ गतीने सुरू असल्याचे पत्रात लिहिले आहे.

PM Narendra Modi
Gautami Patil : गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांना शॉक लागण्याचीही पर्वा नाही, थेट खांबावर चढले अन्...

तसेच राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तेढ वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला दीर्घ चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने (CBI) अटक केली. त्यांना अटक करताना त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा दाखवण्यात आला नाही. 2014 पासून ज्या नेत्यांवर कारवाई झाली, त्यापैकी बहुतांश नेते विरोधी पक्षातील आहेत.

PM Narendra Modi
kalyan Crime News : कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून मॅनेजरवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

या 9 नेत्यांनी संयुक्त पत्र लिहिले

1. बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी

2. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल

3. पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान

4. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS प्रमुख के चंद्रशेखर राव

5. यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव

6. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव

7. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)

8. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

9. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com