kalyan Crime News : कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून मॅनेजरवर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Crime News : या प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केलीय.
kalyan Crime News
kalyan Crime NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

Latest Kalyan News : कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या वादातून एका फर्निचर कंत्राटदाराने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला घडवून आणण्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केलीय. पंकज पाटील,शैलेश राठोड, सुशांत जाधव महेश कांबळे अशी या चार आरोपींची नावे आहेत .

kalyan Crime News
Shirur Accident : बाळुमामा पालखी दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; आठ जण गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर

डोंबिवलीमध्ये (Dombivli) राहणारे सुरेंद्र मौर्या हे एमआयडीसीमधील एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करतात. सुरेंद्र 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील काम आटोपून ते आपल्या मोटरसायकल वरून घरी जाण्यासाठी निघाले. मात्र एमआयडीसी परिसरात वाटेत दबा धरून बसलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी थांबवून त्यांना लोखंडी रॉड ने मारहाण केली .

दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. यासंदर्भात मानपाडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्रँच करत होती. कल्याण क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला याच दरम्यान क्राइम ब्रांचचे पोलीस नाईक गुरुराज यांना या गुन्ह्यातील आरोपी हा सोनार पाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सोनल पाडा परिसरात सापळा रचून पंकज पाटील,शैलेश राठोड, सुशांत जाधव महेश कांबळे या चौघांना ताब्यात घेतले.

kalyan Crime News
Gautami Patil : गौतमीला पाहण्यासाठी चाहत्यांना शॉक लागण्याचीही पर्वा नाही, थेट खांबावर चढले अन्...

दरम्यान सुरेंद्र मौर्या मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या कंपनीत आरोपी पंकज पाटील याचे फर्निचरचे कंत्राट होते. मात्र काही कारणास्तव पंकज याचे कंत्राट रद्द करून ते इतर कोणाला देण्यात आले. त्यामुळे पंकजला सुरेंद्र वर राग होता. याच रागातून पंकजने सुरेंद्रला मारण्याचा प्लान आखला होता. त्यासाठी त्याने शैलेश राठोड, सुशांत जाधव महेश कांबळे यांची मदत घेतली या तिघांनी सुरेंद्र यांना घरी जाताना गाठत त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com