Mahakumbh Accident: कारची ट्रकला भीषण धडक, ८ भाविकांचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी; VIDEO व्हायरल

Mahakumbh Devotees Accident 8 Dead: भाविकांनी भरलेल्या टाटा सुमो आणि ट्रकचा जौनपूरच्या बदलापूर पोलीस स्टेशन परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv News
Published On

प्रयागराज महाकुंभात स्नान करून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या टाटा सुमो आणि ट्रकचा जौनपूरच्या बदलापूर पोलीस स्टेशन परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मदतीसाठी स्थानिक लोकांनी धाव घेतली, नंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू तर, ६ जण गंभीर जखमी आहेत.

अपघात नेमका कसा घडला?

महाकुंभमेळ्यात स्नान करून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या टाटा सुमोचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील प्रत्यक्षदर्शींनीनी सांगितले की, सुमोने अचानक ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होती की, यात चालक आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नंतर स्थानिक लोकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या अपघातात जे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात घडला कसा? या अपघाताला जबाबदार कोण? याचा तपास पोलीस करीत आहे.

Accident News
Crime News: क्रूरतेचा कहर! आईने नवजात अर्भकाला स्वच्छतागृहात फेकलं, परिसरात खळबळ

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. टाटा सुमो आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. ट्रकला धडकलेल्या टाटा सुमो या वाहनाचा चकणाचूर झाला आहे. गाडीचा पुढील भाग आतल्या बाजूस गेला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com