Chhattisgarh Accident: भीषण अपघातात ६ महिलांचा मृत्यू; अनेक जण जखमी

या भीषण अपघातात जखमी झालेल्या लोकांना रायपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Accident News
Accident NewsSaam TV
Published On

छत्तीसगड - रायपूरमध्ये (Raipur) झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) सहा महिलांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 30 वरील मध्यवर्ती भागात हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा परिसर अभानपूर पोलीस (Police) ठाण्यांतर्गत येतो. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या भीषण अपघातात जखमी झालेल्या लोकांना रायपूरच्या सरकारी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. (Raipur Accident News In Marathi)

हे देखील पहा -

याबाबद रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले, 'सर्व लोक गरियाबंदमध्ये जत्रेला जात असताना वाटेत एसयूपीच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात 6 महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident News
नाशकात रिक्षा चालकाची स्टंटबाजी; 7 वर्षांच्या चिमुकलीसह 3 जण गंभीर जखमी

मृतांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला मूळचा दुर्ग जिल्ह्यातील आहे. हे सर्वजण जत्रेत सहभागी होण्यासाठी निघाले होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे एसपींनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com