नाशकात रिक्षा चालकाची स्टंटबाजी; 7 वर्षांच्या चिमुकलीसह 3 जण गंभीर जखमी

जेलरोडच्या मिल्लत पब्लिक स्कुलसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Nashik News
Nashik Newsअभाजीत सोनावणे
Published On

नाशिक - चालकाच्या स्टंटबाजीमुळे एका 7 वर्षांच्या चिमुकलीसह 3 जण गंभीर जखमी झालेत. नाशिकच्या जेलरोड परिसरात ही घटना घडली आहे. रिक्षाचालक स्टंटबाजी करत असतांना भरधाव रिक्षा उलटून हा अपघात घडला. त्यामुळे नाशिकमधील (Nashik) मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Latest News)

नाशिकच्या जेलरोड परिसरात भरधाव रिक्षा चालवून स्टंटबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाच्या स्टंटबाजीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 वर्षांच्या चिमुकलीसह तिघे जण गंभीर झालेत. जेलरोडच्या मिल्लत पब्लिक स्कुलसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे देखील पहा -

भरधाव वेगाने रिक्षा चालवून स्टंटबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्यानं रिक्षा अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या पालकांना रिक्षाने धडक दिल्यानं ते जखमी झालेत, तर रिक्षातील प्रवाशासह रिक्षाचालकदेखील जखमी झाला आहे. आता या स्टंटबाज रिक्षाचालकांविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Nashik News
'आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव'; सदाभाऊ खोतांची राऊतांना कोपरखिळी

याआधी अनेकदा रिक्षा चालवताना स्टंटबाजी करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे अपघात घडल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. आतादेखील या स्टंटबाज रिक्षाचालकामुळे 3 जणांचे प्राण थोडक्यात बचावले असले तरी ते गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी शहरातील अशा बेशिस्त आणि स्टंटबाज रिक्षाचालकांना चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com