
सुप्रीम मस्कर, साम टिव्ही
नवी दिल्ली : देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहतात... ऐकून धक्का बसला ना? हो ...देशात 5 लाख पाकिस्तानी महिला राहताय आणि या सर्व माहिला भारतीय पुरुषांशी लग्न करून इथे वास्तव्य केलंय.. हा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलाय. त्याच्या या दाव्यानं भारतीयांची चिंता वाढवलीय. एकीकडे केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे 5 लाख महिला कोणत्याही नागरिकत्वाशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचं समोर येतंय.निशिकांत दुबे नकाय म्हणाले पाहूयात...
केंद्र सरकारच्या अल्टिमेटमनंतर देशात लॉग टर्म व्हिसा, डिप्लोमेटिक आणि ऑफिशयल व्हिसा असणारेच लोक राहू शकतात. त्यात भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून 48 तासात त्यांना देश सोडण्यास सांगितलय. आतापर्यंत 537 पाकिस्तानी नागरिक भारत सोडून मायदेशी परतलेत.दुसरीकडे महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहितीही समोर आली आहे.
राज्यात पाकिस्तानी नागरिकांची संख्या
नागपूर: 2,458
ठाणे: 1,106
जळगाव: 393
पिंपरी-चिंचवड: 290
नवी मुंबई: 239
पुणे शहर: 111-114
अमरावती शहर: 117
वाशिम शहर: 106
छत्रपती संभाजीनगर शहर: 58
कोल्हापूर: 58
मीरा-भाईंदर: 26
अकोला: 22
रायगड: 17
सोलापूर शहर: 17
अहमदनगर: 14
यवतमाळ: 14
मुंबई: 14
बुलढाणा: 7
धुळे शहर: 6
गोंदिया: 5
अमरावती ग्रामीण: 1
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण: 1
एकूण: 5,023- 5,037
एकट्या महाराष्ट्रात जर 5 हजाराहून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असतील. तर संपूर्ण देशातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी असेल. त्यात भारतीय पुरुषांशी लग्न करून देशात राहणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. राज्यापुरत बोलायचं झालं तर ..
रत्नागिरी जिल्ह्यात 3 पाकिस्तानी महिला
मंडणगडमध्ये 1, तर दापोलीमध्ये 2 पाकिस्तानी महिला
तिघींचाही भारतीय व्यक्तींशी विवाह
तिन्ही पाकिस्तानी महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा
नाशकात 6 पाकिस्तानी महिला
भारतीय मुस्लिम व्यक्तींसोबत त्यांचा विवाह
मॅरीड टू इंडियन सिटीजन व्हिसावर नाशकात वास्तव्य
सखोल चौकशी केली तर ही संख्या वाढण्याची शक्यताच अधिक आहे. भारत- पाकिस्ताना दरम्यान कधीही युध्द भडकण्याची शक्यता असताना या पाकिस्तानी नागरिकांचा केंद्रसरकारनं ताबडतोब बंदोबस्त करायला हवा..लग्न करून इथेच राहणाऱ्या पाकिस्तानी महिलांचीही सखोल चौकशी व्हायला हवी. कारण देशाच्या सुरक्षेशी तडजोड भारताला परवडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी महिलांची घरवापसी कधी होणार हेच पाहायचं....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.