Butter Chicken: धक्कादायक! बटर चिकनची ग्रेव्ही चाखताच २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Butter Chicken : बटर चिकनची ग्रेव्ही चाखताच इंग्लंडमधील एका २७ वर्षीय मेकॅनिकचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जोसेफ हिगिन्सन असं या व्यक्तीचं नाव आहे. चिकन ग्रेव्ही खाल्याने कसा काय जीव जाऊ शकतो, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला घटनेची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल.
Butter Chicken: धक्कादायक! बटर चिकनची ग्रेव्ही चाखताच २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Published On

UK 27-year-old man Died Due To Butter Chicken :

इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. बटर चिकन चिकन खाल्ल्यामुळे एका २७ वर्षी मॅकेनिक असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. जोसेफ हिगिन्सन, असं या व्यक्तीचं नाव आहे. बटर चिकन खाल्ल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडालीय. मिळालेल्या माहितीनुसार जोसेफ हिगिन्सन हा ग्रेटर मँचेस्टरमधील बरी येथील रहिवाशी होता.(Latest News)

जोसेफने एका हॉटेलच्या पार्सल सुविधेतून बटर चिकनचं पार्सल आणलं होतं. घरी आल्यानंतर तो चिकन खाऊ लागला. परंतु चिकनचा एक घास तोंडात घेताच त्याला चक्कर आली आणि खाली कोसळला. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. चिकन ग्रेव्ही नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स टाकून बनवण्यात आली होती. याच नट्सची हिगिन्सनला ॲलर्जी होती, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे. जोसेफला काजू आणि बदामची ॲलर्जी होती, या ॲलर्जीला अॅनाफिलेक्सिस म्हणतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बटर चिकन घेत असताना हिगिन्सनने चिकनमध्ये नट्स असल्याचं लेबल त्याने बघितलं होतं. तरीही त्याने बटर चिकन घेतलं आणि घरी आला. मागे एकदा त्याने हे नट्स खाल्ले होते. त्यावेळी त्याला काहीच त्रास झाला नव्हता. त्यामुळे नट्स असलेलं बटर चिकन हिगिन्सनने आणलं. आधी काही त्रास न झाल्याने त्याने बदाम असलेल्या चिकनचा एक घास खाल्ला आणि त्याचा जीव गेला. हिगिन्सनचा ॲनाफिलेक्सिस मृत्यू झाला.

बटर चिकन खाल्ल्यामुळे जोसेफचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. चिकनमुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. जोसेफने जेथे बटर चिकन आणलं होतं त्या टेक वेची तपासणी केली. परंतु त्यात कोणताच दोष आढळला नाही. दरम्यान जोसेफच्या कुटुंबियांनी वेगळीच शंका उपस्थित केलीय.

त्याच्या मते जोसेफला त्याच्या ॲलर्जीविषयी चांगली महिती होती. एलर्जीचा त्रास होईल असं कोणतेच पदार्थ आणले नव्हते असं म्हटलंय. जोसेफची बहिण यासंदर्भात म्हणाली की, ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी ह्या आजाराला गांभीर्याने घेतलं पाहिजे, नाहीतर ॲलर्जीमुळे जीव जाऊ शकतो.

Butter Chicken: धक्कादायक! बटर चिकनची ग्रेव्ही चाखताच २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Shocking News : डायल १०० करण्याआधी घरात घडलं होतं भयंकर; मध्यरात्री बायकोला संपवलं, सकाळी ब्रेकफास्ट, सनकी नवऱ्याचं क्रूर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com