४ एप्रिलला पुण्यात हनी सिंगचा धमाका, पण त्याआधीच मोठा अडथळा; थेट पोलीस आयुक्तांना पत्र, नेमकं प्रकरण काय?

yo yo honey singh Pune News : पुण्यात ४ एप्रिलला होणाऱ्या यो यो हनी सिंगच्या कॉन्सर्टपूर्वी वाद निर्माण झाला आहे. गाण्यांमुळे व्यसनाधीनतेचा प्रसार होत असल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांना तक्रार करण्यात आली आहे.
yo yo honey singh Pune News
yo yo honey singh Pune NewsSaam
Published On

yo yo honey singh Pune Concert : प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या ४ एप्रिल रोजी पुण्यात होणाऱ्या त्याच्या 'म्युझिकल कॉन्सर्ट'ला आता चंदीगडमधून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. हनी सिंगची 'चार बॉटल व्होडका' आणि 'मिलियनएर' यांसारखी गाणी तंबाखूजन्य पदार्थ आणि व्यसनाधीनतेचा प्रसार करत असल्याचा दावा करत, चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून या कार्यक्रमाला विरोध केला आहे. यामुळे पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर होणाऱ्या या कार्यक्रमावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त यांना एक पत्र लिहीत यो यो हनी सिंग यांच्या पुण्यात येत्या चार तारखेला होणाऱ्या कार्यक्रमास संदर्भात एक पत्र लिहलं आहे.या पत्रामध्ये संबंधित व्यक्तीने यो यो हनी सिंग ची दोन गाणी ज्यामध्ये चार बॉटल व्होडका आणि मिलेनियर हे गाण्यास मज्जाव करावा अशी विनंती करण्यात आली आहे. हनी सिंग याच्या कार्यक्रमाला अठरा वर्षांपेक्षा कमी असलेल्या तरुणांना सुद्धा प्रवेश दिला जातो मात्र त्याच्या या दोन गाड्यांमधून तंबाखूजन्य भारताचा प्रचार आणि प्रसार होत असल्याने तातडीने आयोजकांनी आणि पोलिसांनी यास मज्जाव घालावा अशी विनंती करण्यात आली आहे.

yo yo honey singh Pune News
Solapur : शिवरायांच्या पुतळ्यावरून सोलापुरात वाद, तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक, पोलिसांवरही हल्ला

संबंधित व्यक्तीने आणखी एका पत्रामध्ये यो यो हनी सिंग ला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्टेजवर कोणतेही वाहन आणू या संदर्भात देखील आयोजकांना आणि पोलिसांना पत्र लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी हनी सिंग याचा मुंबईत एक कार्यक्रम झाला ज्या वेळेला त्यांनी स्टेजवर चक्क एक कार आणली होती. थेट स्टेजवर कार घेऊन आणली गेली तर दुर्घटना होऊ शकते तसंच जीवितहानी सुद्धा होऊ शकते यामुळे त्याला याबद्दल सूचना द्यावी अशी देखील विनंती चंदीगड येथील एका व्यक्तीने केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या यो यो हनी सिंग चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या कार्यक्रमादरम्यान परवानगी नसताना सुद्धा लेझर लाईट लावण्यात आल्यामुळे या कार्यक्रमावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

yo yo honey singh Pune News
NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com