A shocking viral video from Kalyan shows a woman allegedly beating her adopted three-year-old daughter, triggering public outrage and police action
A shocking viral video from Kalyan shows a woman allegedly beating her adopted three-year-old daughter, triggering public outrage and police actionSaam Tv

शेजारच्या महिलेला चिमुकलीने ‘मम्मा’ म्हटलं; संतापलेल्या आईने 3 वर्षांच्या दत्तक मुलीला बेदम मारलं, VIDEO व्हायरल

Woman Beats Adopted Child In Kalyan Viral Video: कल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दत्तक घेतलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीने शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हटल्याने संतापलेल्या आईने तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला एका महिलेने अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कल्याणमधील बैलबाजार परिसरातील झंकार मोहल्ला येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये एक महिला लहान चिमुकलीला मारहाण करताना दिसत असून तिच्यावर अत्यंत कठोर वागणूक दिली जात असल्याचेही दिसून येत आहे. ही चिमुकली दत्तक घेतलेली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चिमुकलीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला मम्मा असे म्हटल्याच्या कारणावरून संबंधित महिला संतापली आणि तिने त्या चिमुकलीला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. सदर महिला आणि तिच्या पतीचा तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

सराईत चैनस्नेचर मोहम्मद इराणी गजाआड

खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरटा मोहम्मद इराणीला सापळा रचत आंबिवली येथील इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या आहेत.इराणीच्या अटकेचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे .या कारवाईमुळे आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ठाणे येथील मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंगचा एक गुन्हा दाखल होता .या गुन्ह्यात मोहम्मद इराणी हा पसार झाला होता.

पोलीस त्याचा शोध घेत होते .यात दरम्यान मोहम्मद इराणी हा कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . चितळसर पोलिसांनी याबाबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली .या माहितीच्या आधारे DCPअतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे ,PSI भूषण देवरे ,ASI सुधीर पाटील ,पोलीस कर्मचारी किरण शिर्के , संजय चव्हाण , अनंत देसले ,पोपट धुळगंड या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला मोहम्मद इराणी दिसतात खडकपाडा पोलिसांच्या पत्राने त्याच्यावर झटकली इराणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठा धाडसाने मोहम्मद इराणी याला बेटा ठोकल्यात इराणी यांच्या अटकेचा हा थरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं मोहम्मद इराणी याला खडक पोलिसांनी मानपाडा चितळसर पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com