दोघे विवाहित, मुले गाढ झोपली होती; पहाटे पहाटे घरात विपरीत घडलं, महिलेनं बॉयफ्रेंडचं गुप्तांग कापलं

Mumbai Santacruz Crime : मुंबईच्या सांताक्रूझमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. महिलेनं बॉयफ्रेंडचं गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
Mumbai Crime news
Mumbai CrimeSaam tv
Published On
Summary

मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

लग्नास नकार दिल्याने प्रियकरावर हल्ला

महिलेविरुद्ध वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल

संजय गडदे, साम टीव्ही

लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ पूर्व परिसरात घडली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी कांचन राकेश महतो (वय २५) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीचे नाव जोगिंदर महतो (वय ४४) असून तो सांताक्रूझ पूर्व येथे राहणारा कॅब चालक आहे. जोगिंदर विवाहित असून त्याला १० व १४ वर्षांची दोन मुले आहेत. आरोपी कांचन महतो ही जोगिंदरच्या बहिणीच्या सासरकडील नातेवाईक असून ती देखील विवाहित आहे. तिलाही ७ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. कांचन घरकाम करते, तर तिचा पती रिक्षाचालक आहे.

Mumbai Crime news
ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

तक्रारीनुसार, कांचन जोगिंदरवर सतत लग्नासाठी दबाव टाकत होती. या कारणावरून जोगिंदरच्या घरी वारंवार वाद होत होते. या त्रासाला कंटाळून जोगिंदर नोव्हेंबर २०२५ मध्ये बिहारमधील आपल्या मूळ गावी गेला होता. मात्र, त्यानंतरही कांचनकडून त्याला सतत फोन येत होते. मुंबईत परत येऊन तिच्याशी लग्न न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तिने दिल्याचा आरोप आहे.

जोगिंदर १९ डिसेंबर रोजी मुंबईत परतला, मात्र तिने भेट टाळण्याचा प्रयत्न केला. दोघेही विवाहित असून मुलं आहेत, हे समजावून सांगण्याचाही त्याने प्रयत्न केला. दरम्यान, १ जानेवारी रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास कांचनने जोगिंदरला फोन करून नववर्षानिमित्त मिठाई आणल्याचे सांगत आपल्या घरी बोलावले. तो तेथे पोहोचला असता तिची मुले झोपलेली होती. त्याचवेळी कांचनने धारदार चाकूने जोगिंदरच्या गुप्तांगावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

Mumbai Crime news
राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

गंभीर जखमी अवस्थेतही जोगिंदर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने आपल्या मोठ्या मुलाला माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला प्रथम व्ही. एन. देसाई रुग्णालयात, त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. या प्रकरणी जोगिंदरच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी आरोपी कांचन महतो हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) (धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करणे) आणि कलम ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com